Mumbai Rain: Mumbai Rain: येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, मुंबईच्या वेगावर परिणाम

सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान परळ आणि दादरमध्ये 14 मिमी, तर मलबार हिल आणि नायर रुग्णालय परिसरात 19 मिमी पाऊस पडला, अशी माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली.

Mumbai Rain: Mumbai Rain: येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, मुंबईच्या वेगावर परिणाम
Mumbai Rain
रचना भोंडवे

|

Aug 16, 2022 | 1:35 PM

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर वाढल्याने आज, मंगळवारी मुंबईत मुसळधार (Mumbai Heavy Rain) पावसाने हजेरी लावली. तरी आतापर्यंत सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं कुठंही आढळून आलेलं नाही, पण तसा इशारा देण्यात आलेला आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या गाड्या आणि बससेवा चालू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीये. पहाटे शहराच्या बहुतांश भागात पाऊस पडलाच नाही, सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, असे त्यांनी सांगितले. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान परळ (Parel) आणि दादरमध्ये (Dadar Rain) 14 मिमी, तर मलबार हिल आणि नायर रुग्णालय परिसरात 19 मिमी पाऊस पडला, अशी माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली.

पुढील २४ तास अधूनमधून तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता

पूर्व उपनगरात याच काळात विक्रोळी अग्निशमन केंद्रात १२ मिमी तर चेंबूर अग्निशमन केंद्रात ११ मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगरातील मालवणी अग्निशमन केंद्र आणि चिंचोली अग्निशमन केंद्रात २२ मिमी आणि २० मिमी पावसाची नोंद झाली. शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून पुढील २४ तास अधूनमधून तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात 24 तासांच्या कालावधीत 7.91 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 12.94 मिमी आणि 12.33 मिमी पावसाची नोंद झाली, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात 4.39 मीटर उंचीची भरती येईल

दुपारी २.५७ वाजता अरबी समुद्रात ४.३९ मीटर उंचीची भरती येईल, असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असून शहरातील बहुतांश भागात हलक्या सरी कोसळल्यात. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें