Mumbai : वीज यंत्रणा पाण्यात गेल्याचा अलर्ट सेकंदाला मिळणार

पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 125 ठिकाणी कंपनीने पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसवले आहेत

Mumbai : वीज यंत्रणा पाण्यात गेल्याचा अलर्ट सेकंदाला मिळणार
अदानीचे उपनगरात 125 ठिकाणी पाणीपातळी दर्शविणारे सेन्सरImage Credit source: (Image Google)
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:02 AM

मुंबई : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) उपनगरात (Suburbs) अनेक ठिकाणी पाणी भरते. त्यामुळे वीज पुरवठा (Power supply)बंद ठेवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या भागात किती पाणी भरले आहे, वीज वितरण यंत्रणेला (Power distribution system) पाणी लागले की नाही याबाबतची प्रत्येक सेकंदाची माहिती आता अदानी इलेक्ट्रिसिटीला (Adani Electricity) मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी पाणी भरणारी 125 ठिकाणे निश्चित करून तेथे सेन्सर बसवले आहे. या माध्यमातून अदानीला कोणत्या भागातील वीज पुरवठा कधी बंद करावा,  कधी सुरू करावा याचे योग्य नियोजन करता येणार आहे.

पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर

अदानी इलेक्ट्रिसिटीचे उपनगरात 28 लाख वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कंपनीकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीने मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. येथे सॅटेलाइट, वायरेलस, हॉटलाइन, वॉकीटॉकी आणि रिमोट उपकरणांच्या माध्यमातून कंपनीच्या अंतर्गत विभागात समन्वय साधून अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

अदानीचे उपनगरात 125 ठिकाणी पाणीपातळी दर्शविणारे सेन्सर

पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 125 ठिकाणी कंपनीने पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसवले आहेत. तसेच खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी क्वीक रिस्पॉन्स टीम तैनात केल्या आहेत. त्याचबरोबर डिझेल जनरेटर सेट उपलब्ध करून दिले आहेत. आपत्कालीन संपर्कसाठी टोल फ्री क्रमांक – 19122.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.