मित्र बुडताना पाहून दोन भावांची नदीत उडी, तिघेही बुडाले

मुंबईतील तीन तरुणांचा नदीमध्ये बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहा तालुक्यातील बल्ले गावातील नदीमध्ये घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

मित्र बुडताना पाहून दोन भावांची नदीत उडी, तिघेही बुडाले

रायगड : मुंबईतील तीन तरुणांचा रायगडमधील कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यातील बल्ले गावात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. महेश जेजुरीकर (39), अक्षय गणगे (29) आणि परेश जेजुरीकर अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहेत. बुडालेल्यांमध्ये दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरु आहेत.

मुंबईतील ट्रॉम्बे परिसरातील 28 जणांचा ग्रुप रायगड येथे पर्यटनासाठी आला होता. यावेळी हे सर्वजण नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक अक्षय गणगे हा बुडू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी महेश आणि परेश जेजुरीकर या दोन्ही भावांनी नदीत उडी घेतली. पण या घटनेत तिघांचाही  नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

कोलाड पोलिसांसह रोहा-माणगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक राफ्टिंग क्लबच्या सदस्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले आहे. यावेळी महेश जेजुरीकर आणि अक्षय गणगे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले असून परेश जेजुरीकरचा मृतदेह अजून सापडलेला नाही.


Published On - 9:09 am, Mon, 17 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI