AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन पडलं महागात! एका रात्रीत तब्बल दीड कोटींचा दंड, नेमकं काय घडलं?

मुंबईत नवीन वर्षाच्या रात्री वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहिमेत तब्बल १३,७५२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १ कोटी ३१ लाखांहून अधिक दंड वसूल झाला असून मद्यपी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईकरांना थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन पडलं महागात! एका रात्रीत तब्बल दीड कोटींचा दंड, नेमकं काय घडलं?
mumbai
| Updated on: Jan 02, 2026 | 9:36 AM
Share

देशभरात सर्वत्र नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक लोक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मुंबईतील रस्त्यांवरील सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या हजारो वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या २११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईद्वारे पोलिसांनी एकूण १ कोटी ३१ लाख १४ हजार ८५० रुपयांचा दंड ई-चलानद्वारे आकारला आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सर्व प्रमुख चौक, एन्ट्री पॉईंट्स आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट नाकाबंदी केली होती. सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी आधुनिक ब्रेथअलायझरचा वापर करून वाहनचालकांची तपासणी केली. पोलिसांनी आधीच जनजागृती केली असतानाही अनेक चालकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत २११ गुन्हे नोंदवण्यात आले.

पोलिसांकडून कारवाईचा बडगा

मद्यपान करून वाहन चालवणे हे केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला होता. तरीही काही उत्साही मद्यपी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. रात्री १० वाजेपासून सुरू झालेली ही तपासणी पहाटेपर्यंत सुरू होती.

केवळ ड्रंक अँड ड्रायव्हिंगच नव्हे, तर इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली. रस्ते सुरक्षेच्या इतर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यात एकूण १३,७५२ ई-चलान कापण्यात आले. यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला. तसेच ट्रिपल सीट प्रवास करणे, रॉन्ग साईड ड्रायव्हिंग करणे, सीट बेल्ट न लावणे, वेगाने गाडी चालवणे आणि सिग्नल तोडणाऱ्यांचे फोटो सीसीटीव्हीद्वारे कैद करून त्यांना थेट दंड लावण्यात आला. या सर्व कारवायांतर्गत एकूण १३,७५२ ई-चलान जारी करण्यात आली. या माध्यमातून मुंबई पोलिसांनी एकूण १,३१,१४,८५० रुपये दंड आकारला आहे.

पोलिसांचे मोठे यश

वाहतूक पोलिसांनी या कारवाईपूर्वी सोशल मीडिया आणि बॅनरच्या माध्यमातून Don’t Drink and Drive अशी मोहीम राबवून जनजागृती केली होती. मात्र, बेपरवाईने वागणाऱ्या चालकांमुळे पोलिसांना ही कठोर पावले उचलावी लागली. या मोहिमेमुळे नवीन वर्षाच्या रात्री मुंबईत कोणताही मोठा किंवा भीषण अपघात झाला नाही, हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने रात्रभर गस्त घातली होती. ज्यामुळे मोठ्या अपघातांच्या घटना टाळल्या गेल्या.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.