AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 30 तास पाण्याचा थेंबही मिळणार नाही, महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा यादी

मुंबई महापालिकेने वडाळा येथील नवीन जल बोगद्याच्या कामासाठी ५ आणि ६ मे रोजी ३० तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. कुर्ला, घाटकोपर, वडाळा आणि परळ या भागांवर याचा मोठा परिणाम होणार असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 30 तास पाण्याचा थेंबही मिळणार नाही, महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा यादी
mumbai water cut
| Updated on: May 06, 2026 | 7:35 AM
Share

मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी वडाळा परिसरात एका महाकाय बोगद्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यासाठी मुंबई महापालिकेने ५ आणि ६ मे रोजी ३० तासांचा मोठा शटडाऊन जाहीर केला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मध्य आणि पूर्व मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

नेमका प्रकल्प काय?

मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिका वडाळ्यातील अमर महाल ते प्रतीक्षा नगर दरम्यान १८०० मिमी व्यासाचा एक नवीन जल-बोगदा तयार केला जात आहे. हा नवीन बोगदा परळ आणि ट्रॉम्बे येथील मुख्य जलाशयांना (Service Reservoirs) जोडला जाणार आहे. तसेच भविष्यात हा बोगदा तुर्भे येथील उच्च-स्तरीय जलाशयापर्यंत नेला जाईल, ज्यामुळे दक्षिण आणि पूर्व मुंबईचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल. १८०० मिमी आणि १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्यांची जुन्या यंत्रणेशी जोडणी करण्यासाठी हा शटडाऊन घेण्यात आला आहे.

या जलप्रकल्पांतर्गत जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे. ते बुधवारी ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही उंचावर असलेल्या भागांत पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी गुरुवार उजाडण्याची शक्यता आहे.

कुठे बसणार सर्वाधिक फटका?

१. एल वॉर्ड (कुर्ला विभाग):

येथे सर्वाधिक फटका बसणार आहे. साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), न्यू टिळक नगर, कुरेशी नगर, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, शिव सृष्टी मार्ग, कामगार नगर, कुर्ला कारशेड आणि रेल्वे कॉलनी या भागांत पाणी पूर्णपणे बंद राहील.

२. एन वॉर्ड (घाटकोपर विभाग):

घाटकोपर पूर्व आणि पश्चिम, विक्रोळी, विद्याविहार आणि आसपासच्या सर्व सखल व उंचावरील भागांत पाणीपुरवठा खंडित असेल.

३. एफ/उत्तर वॉर्ड (वडाळा/शीव):

प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, शीव पूर्व आणि पश्चिम भाग.

४. एफ/दक्षिण वॉर्ड (परळ/शिवडी):

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, शिवडी, जेरबाई वाडिया मार्ग, आचार्य दोंदे मार्ग, साने गुरुजी मार्ग आणि लालबागचा काही भाग.

५. एम/पूर्व आणि एम/पश्चिम वॉर्ड:

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होईल किंवा अतिशय कमी दाबाने मिळेल.

प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

शटडाऊन सुरू होण्यापूर्वीच पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवावे. पाणी कपातीच्या काळात बागांना पाणी घालणे, गाड्या धुणे किंवा पाण्याचा अपव्यय होईल अशी कामे टाळावीत. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास गढूळ पाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे. महापालिकेच्या या कामामुळे भविष्यात मात्र कुर्ला, घाटकोपर आणि वडाळा परिसरातील पाणीपुरवठ्याचा दाब वाढणार असून गळतीची समस्या कमी होणार आहे, असा विश्वास जल अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान या दुरुस्तीचे काम मोठे असल्याने रहिवाशांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि या काळात पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. आज संध्याकाळनंतर पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत केला जाईल.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!