AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिहीरची आई आणि दोन बहिणी घराला टाळे ठोकून फरार, वरळी हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची अपडेट

आरोपी मिहीर शाह हा दहावी पास आहे. त्याच्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. मिहिरची आई, दोन बहिणी घराला टाळे ठोकून फरार आहेत. पोलिसांची चार पथकं मिहीरचा शोध घेत आहेत. पोलीस पथकांनी ठिकठिकाणी जाऊन तपास केला आहे.

मिहीरची आई आणि दोन बहिणी घराला टाळे ठोकून फरार, वरळी हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची अपडेट
वरळी हिट अँड रन प्रकरण
| Updated on: Jul 07, 2024 | 6:05 PM
Share

वरळी हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याने आज भल्या पहाटे एका दुचाकीला धडक दिली. यानंतर त्याने महिलेवर गाडी चालवून तिला फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याचे वडील तथा शिवसेना उपनेते राजेश शाह यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मिहीर शाह याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कलम १०५,२८१,१२५ १,२८१,१२५ (ब), (ब),२३८,३२४ (४) तसेच १८४,१३४(अ),१३४ (ब), १८७ या मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त गाडी मिहीर शाहाच्या नावावर असून मिहिर गाडीचा सेकंड ओनर आहे. अपघातानंतर मिहीर वांद्रे कलानगर येथे गाडी सोडून पळून गेला. त्याने वडिलांना सकाळी अपघातानंतर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तो फोन बंद करुन पळून गेला. मिहीर दहावी पास आहे. त्याच्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. मिहिरची आई, दोन बहिणी घराला टाळे ठोकून फरार आहेत. पोलिसांची चार पथकं मिहीरचा शोध घेत आहेत. पोलीस पथकांनी ठिकठिकाणी जाऊन तपास केला आहे.

नेमकं काय घडलं?

वरळी पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रदीप नाखवा (वय ५० वर्षे) हे त्यांच्या पत्नी कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांच्यासोबत त्यांचे मालकीच्या सुझुकी कंपनीची अॅक्सेस स्कुटर क्र एम.एच ०१, डी.यु ६४१८ वरून अॅनी बेझंट रोड वरुन वरळी कोळीवाड्याकडे जात होते. या दरम्यान लॅन्डमार्क जीप शोरूम समोर, डॉ. अॅनी बेझंट रोड, येथे मागुन येणाऱ्या बीएमडब्लु कार क्र एम. एच ४८, ए. के-४५५४ या कारने स्कुटरला मागुन जोराची धडक दिली.

संबंधित गाडी ही मिहीर शाह याची होती. त्याने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेलं होतं. या घटनेबाबत वरळी पोलीस ठाण्याला खबर मिळाली असता वरळी पोलीस ठाण्यातील मोबाईल वाहन आणि स्टाफने जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी नायर हॉस्पीटल येथे नेलं. पण तेथील अपघात विभागातील डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. पोलिसांनी राजेश शाह आणि अपघातावेळी सोबत असलेला व्यक्ती राजेंद्रसिंग बिडावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.