सेल्फ टेस्ट किटची माहिती पालिकेला देणे बंधनकारक, आयु्क्तांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

सेल्फ टेस्ट किटचा वापर करणाऱ्यांनी त्यांचा अहवाल अपलोड करणे आवश्यक आहे. रूग्णाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. या किटचे वितरण करणाऱ्यांनी विक्रेत्यांना किती किट दिली आहेत, याची माहिती आम्हाला देणं बंधनकारक केलंय. असे अतिरिक्त आयुक्त म्हणाले.

सेल्फ टेस्ट किटची माहिती पालिकेला देणे बंधनकारक, आयु्क्तांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर
मुंबईतल्या कोरोना नियमात शिथिलता
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:00 PM

मुंबई : देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दहशत माजवली आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसात राज्यात 46 हजार 406 रुग्ण (Corona) आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला आकडा काहीसा घसल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळताना दिसून येत आहे. मात्र तरिही मुंबईतील रुग्णवाढ ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. कोरोनाच्या स्फोटक वाढीने मुंबईला लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते, त्यामुळे मुंबई महापालिका (Bmc) प्रशासन अलर्ट मोडवर येत, काही कठोर निर्णय घेत आहे. अनेकजण सध्या सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत, मात्र याबाबत पालिकेला माहिती देणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी काय म्हणाले?

सेल्फ टेस्ट किटचा वापर करणाऱ्यांनी त्यांचा अहवाल अपलोड करणे आवश्यक आहे. रूग्णाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. या किटचे वितरण करणाऱ्यांनी विक्रेत्यांना किती किट दिली आहेत, याची माहिती आम्हाला देणं बंधनकारक केलंय. त्याच बरोबर मेडिकलवाल्यांनी कुणाला विकले असतील त्यांची संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी लागेल. रोज संध्याकाळी ६ वाजता ही माहिती मेल करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. वॉर्डनिहाय याची विभागणी करून वॉर्डरूम मार्फत या व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. असेही काकाणी यांनी सांगितले आहे.

मुलांच्या लसीकरणाचे सेंटर्स वाढवले

कोरोनाची तिसरी लाट आल्याने लहान मुलांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रातही लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले. लहान मुलांच्या लसीकरणासाठी पूर्वी कमी सेंटर होते, आता सेंटर्स वाढवले आहेत. यामुळं लसीकरणाची संख्या वाढून 20 टक्क्यांपर्यंत पोहचलीय. येत्या काही दिवसांत 100 टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य होईल, असेही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’वर मिळणार बीएमसीच्या 80 पेक्षा अधिक सुविधांची माहिती, नवा उपक्रम काय? वाचा सविस्तर

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्याला 40 लाख लसींची आवश्यकता : राजेश टोपे

Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.