AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना वेग, कामाच्या चित्रफिती सादर करणे कंत्राटदारांना बंधनकारक

यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात 30 हजार 142 मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये 73 हजार 443 मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 48 हजार 025 मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना वेग, कामाच्या चित्रफिती सादर करणे कंत्राटदारांना बंधनकारक
बोरिवली आणि दहिसरमधील काही परिसरांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:23 AM
Share

मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नाल्यां (Drainage)मधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु करण्यात आली आहेत. यंदा पावसाळ्या (Monsoon)पूर्वी एकूण 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाली असून पावसाळ्यापूर्वी म्हणजे 31 मे 2022 रोजीच्या विहित मुदतीत ही कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. (Municipal Corporation starts cleaning drainage in Mumbai on the backdrop of monsoon)

मुंबईत दरवर्षी मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. यंदाच्या या कामांचा विचार करता, मोठ्या नाल्यांसाठी एकूण 6 निविदा मंजूर करण्यात आल्या असून त्यांचे मूल्य सुमारे 71 कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे 91 कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या 17 निविदांना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी 2, पूर्व उपनगरांसाठी 6 तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी 9 निविदा आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे 162 कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यंदा 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट

नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात 30 हजार 142 मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये 73 हजार 443 मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 48 हजार 025 मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे, असे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले. (Municipal Corporation starts cleaning drainage in Mumbai on the backdrop of monsoon)

इतर बातम्या

Pravin Darekar: कधी मजूर तर कधी बिझनेसमन! 350 रुपये मजुरीवर काम केलंय दरेकरांनी! खरंच?

मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा! असं काय आहे मुंबई महापालिकेत? जाणून घ्या सविस्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.