AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर यांची अभिनय क्षेत्रात कशी झाली एंट्री? वडिलांचा तो सल्ला आयुष्यभर जपला, तमाशाचा किस्सा सांगत उलगडला प्रवास

Nana Patekar passes away: आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर अमिट छाप सोडणारे नाना पाटेकर आज आपल्यातून हरवले आहेत. नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वनवास या सिनेमावेळी वडिलांची ती आठवण जागवली होती. आयुष्यभर तो सल्ला त्यांनी लक्षात ठेवला.

Nana Patekar : नाना पाटेकर यांची अभिनय क्षेत्रात कशी झाली एंट्री? वडिलांचा तो सल्ला आयुष्यभर जपला, तमाशाचा किस्सा सांगत उलगडला प्रवास
नाना पाटेकर यांचं निधन
| Updated on: Oct 08, 2026 | 8:02 AM
Share

प्रसिद्ध अभिनेते, हळवे व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यात हिरारीने सहभागी झालेले नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर कायमची छाप सोडली. त्यांचा आवाज, त्यांची स्टाईल यावर प्रेक्षक फिदा होते. त्यांच्या कसदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत केल्या. हे बाळकडू त्यांना वडिलांच्या प्रयत्नांनी मिळाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. अभिनेते अनिल कपूर यांनी वनवास या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी अभिनयाचा प्रवास उलगडला.

अभिनय क्षेत्रात कशी झाली नानांची एंट्री?

नाना पाटेकर यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांच्या वडिलांना चित्रकलेची आवड होती. नाना पाटेकर यांनाही चित्रकलेची आवड निर्माण झाली. ते उत्तम स्केचेस तयार करायचे. त्यांनी लहानपणीच शाळा, महाविद्यालयात छोट्या छोट्या भूमिका केल्या. घरातून त्यांच्या या अभिनयाला कधी वावडे नव्हते. त्यांच्या वडिलांनी त्यांना अभिनयासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. चित्रकलेचे शिक्षण घेत असतानाच प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकातही काम करू लागले. प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रभावी अभिनयामुळे ते हळूहळू नाट्य वर्तुळात आणि पुढे चित्रपट सृष्टीत गाजले.

चित्रपट सृष्टीत पदार्पण

1978 साली ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ही भूमिका छोटी होती. त्यानंतर त्यांनी आज की आवाज या चित्रपटात सहाय्यक म्हणून भूमिका केली. पुढे एन. चंद्रा यांच्या अंकुश या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. ‘परिंदा’ मधील त्यांच्या भूमिकेचे गारूड प्रेक्षकांच्या मनातून कधी हटलेच नाही. तिरंगा, नटसम्राट आणि अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाची छाप सोडली.

वडिलांचा तो सल्ला कायम लक्षात ठेवला

अनिल कपूर यांना वनवास या चित्रपटादरम्यान त्यांनी मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. मुंबईत त्यांचे वडील त्यांना तमाशा बघायला न्यायचे. तमाशातील ‘वग’ त्यांना समजावून सांगायचे. त्यावेळी जे वग करणारे अभिनेते होते. ते किती तडफेने आणि उत्स्फुर्तपणे अभिनय करतात याचे उदाहरण नाना पाटेकर यांना द्यायचे. कोणत्याही क्षेत्रात माणसानं असं झोकून देऊन तडफेने काम करावे. जे काही करायंचं ते मन लावून आणि उत्स्फुर्तपणे करायचं हा वडिलांचा सल्ला नाना पाटेकर यांनी आयुष्यभर जपला.

Follow Us
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?