रामदेवबाबा, अंबानींना दिलेल्या भूखंडावर उद्योग कधी उभे राहणार?; नाना पटोलेंचा सवाल

मिहान प्रकल्पामधील 230 एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. (nana patole raised questions on maharashtra government allots plots to ambani and ramdev baba)

रामदेवबाबा, अंबानींना दिलेल्या भूखंडावर उद्योग कधी उभे राहणार?; नाना पटोलेंचा सवाल
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 1:52 PM

मुंबई: योगगुरु रामदेव बाबा आणि अनिल अंबानी यांना राज्य सरकारने उद्योग उभारण्याासाठी भूखंड दिला होता. त्या भूखंडावर उद्योग कधी उभे राहणार?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले यांच्या या नव्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (nana patole raised questions on maharashtra government allots plots to ambani and ramdev baba)

नाना पटोले यांनी विधानसभेत हा सवाल केला होता. रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने भूखंड दिला होता. परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?, असा सवाल पटोले यांनी केला आहे.

मिहानमध्ये जागा दिल्या

मिहान प्रकल्पामधील 230 एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन 66 वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे 50 हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज 5 हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये 289 एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष 2000 तर अप्रत्यक्ष 15 हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही, असं पटोले म्हणाले.

माहिती घेऊन कारवाई करू

रामदेवबाबा, अनिल अंबानींसह ज्यांना ज्यांना उद्योग निर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन दिल्या पण त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत. त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिलं. (nana patole raised questions on maharashtra government allots plots to ambani and ramdev baba)

संबंधित बातम्या:

अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड

LIVE | देऊळ बंद, शहापूर मधील गंगा देवस्थान येथील महाशिवरात्रीवर बंदी

मूळचे शिवसैनिक, भाजपचे कट्टर विरोधक; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द

(nana patole raised questions on maharashtra government allots plots to ambani and ramdev baba)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.