Nana Patole : केंद्र सरकार विरोधात नाना पटोले यांची गांधीगिरी, मंगळवारपासून सत्याग्रह करणार, सोनिया गांधींच्या चौकशीचा विरोध

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jul 24, 2022 | 5:19 PM

खा. राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज 10-10 तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही.

Nana Patole : केंद्र सरकार विरोधात नाना पटोले यांची गांधीगिरी, मंगळवारपासून सत्याग्रह करणार, सोनिया गांधींच्या चौकशीचा विरोध
नाना पटोले, कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे केंद्र सरकार (Central Government) विरोधात सत्याग्रह करणार आहेत. सोनिया गांधी यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध करण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोनिया गांधी आजारी आहेत. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही (Dictatorship) विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवारी 26 जुलै रोजी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात येईल. या कारवाईचा विरोध करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या सुडाच्या राजकारणाविरोधात मंगळवारी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) पुतळ्यासमोर सकाळी दहा वाजता सत्याग्रह केला जाणार आहे. जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयातून मुक्त केले जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे. 21 तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

काँग्रेस पक्ष सोनियां गांधींच्या पाठीशी

खा. राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज 10-10 तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही. काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही दडपशाहीला घाबरत नाही. काँग्रेस पक्ष गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हुकुमशाही सरकारला जनताच त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.

सत्याग्रहात हे होतील सहभागी

या शांततापूर्ण सत्याग्रहामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होतील. राज्यभर जिल्हा मुख्यालयी जिल्हा काँग्रेसचे नेते पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदारांसह सर्व विभाग, सेल, आघाडी यांचे पदाधिकारीही सत्याग्रहात सहभागी होतील, असंही पटोले यांनी कळविलं आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI