नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट

खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते.

नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट
congrss stat president nana patole
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 3:30 PM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. नाना पटोले म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आली. तेव्हा मोदी यांनी लोकसभेच्या सभेमध्ये सांगितलं होतं की, आमचं सरकार गरिबांसाठी काम करेल. शेतकऱ्यांसाठी काम करेल. मात्र काल आम्हाला कळलं सगळ्यात गरीब माणूस कोण. अदानीकडून जीएसटी माफ करण्याचं पाप सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी लावला.

दुसरीकडे पिण्याचे पाणी नव्हते

खारघर उष्माबळीच्या दुर्घटनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले, खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते. 13 कोटी 80 लाख जनतेचे खर्च करताना जनता राजा उन्हात बसली होती. एका बाजूला पंचपक्वान्न खात होते. तर, दुसरीकडे मात्र भक्तांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते.

चुकीच्या नियोजनामुळे घडली घटना

अमित शहा यांना उशीर होणार म्हणून 10.30 वाजता चालू होणारा कार्यक्रम हा 11.30 वाजता चालू केला गेला. 12 वाजता उष्माघाताचा पहिला मृत्यू झाला, तरीही कार्यक्रम चालू होता, अशी बातमी वाचायला मिळाली. हत्याकांड हा राज्याच्या चुकीच्या नियोजनमुळे घडला आहे, असा थेट आरोप नाना पटोले यांनी केला.

हे सुद्धा वाचा

सरकारने नेमका आकडा जाहीर करावा

हे सरकार बेशरम आहे. ह्यांना जीव गेला तरी काही फरक पडत नाही. राज्य सरकार 18 मृत्यूचा आकडा दाखवत आहेत. मात्र चेंगरा-चेंगरी पाहून मोठा आकडा आहे. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

या घटनेची चौकशी अशी करावी

खारघर प्रकरणी सरकारने हायकोर्टाची कमिटी बसवून या घटनेची चौकशी करावी. याबाबत राज्यपालाना पत्र लिहलं आहे. 30 तारखेनंतर आमदारांच्या सह्या निशी राज्यपालांची भेट घेऊ, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

देशात सैनिकही सुरक्षित नाहीत

पुलवामाबाबत सत्यपाल मलिक यांनी भूमिका मांडली. त्यांनी प्रधानमंत्री यांना कळवलं होतं. मग एअरशिफ्टिंग का केली नाही. देशामध्ये सैनिकही सुरक्षित नाहीत. डाळ मे कुछ काला है. ह्याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.