AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब गेले अन् उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रुद्राक्ष फेकले; नारायण राणे यांचा गंभीर आरोप

राहुल गांधी कुठल्याही तोंडाने राजकीय नेता वाटत नाही. लोकसभा निवडणुक निःपक्षपाती झाली तर भाजप राहणार नाही असं राहुल गांधी बोलले. आमचे 303 आहेत, तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देखील मिळालं नाही, इतरांवर बोलण्याआधी स्वतःकडे पाहा, असा सल्ला नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.

बाळासाहेब गेले अन् उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रुद्राक्ष फेकले; नारायण राणे यांचा गंभीर आरोप
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 02, 2024 | 6:13 PM
Share

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेब गेले त्यानंतर त्यांचे रुद्राक्ष याच उद्धव ठाकरेंनी फेकून दिले, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. मला मातोश्रीमधील सगळं माहिती आहे, मी अजून सांगितलेलं नाही. बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे. मी कुठल्याच ठाकरेंबद्दल वाईट काही करणार नाही असं बाळासाहेबांना सांगितलं होतं, म्हणून मी शांत आहे, असा सूचक इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.

दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाचा समाचार घेण्यासाठी नारायण राणे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. भाजपला तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली. आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. ज्यांनी कोरोना काळात पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करू. उद्धव ठाकरे यांची मानसिकस्थिती बिघडली आहे. तुझी लायकी आहे काय? अशा ऐकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आम्ही दिलेला पैसा…

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी भाषेतच टीका केली. आम्ही तुला दिलेला भ्रष्ट पैसा नव्हता काय? कोरोना काळात काही माध्यमांची आर्थिक स्थिती ढासळली होती. पण सामना नफ्यात होता. काळा पैसा पांढरा करण्याचं हे काम आहे. कोरोनाकाळात मोदींनी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं, असंही राणे म्हणाले.

मंदिरात मीच पैसा द्यायचो

आम्ही त्यांच्यासोबत मंदिरात जायचो तेव्हा त्याच्यावतीने मीच पैसे द्यायचो, असा खोचक टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. भाजप ठगांचा पक्ष आहे. मग वर्षानुवर्षे आमच्या सोबत राहिल्याने तू पण ठग झालास का? असा सवालच त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस नुकतेच लडाखला जाऊन आले. फडणवीस पक्ष सांगेन तिथं जाऊन येतात. फडणवीसांनी तुम्हाला पाच वर्षे सांभाळलं, ते कसं हे मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

राऊत सगळं सांगायचे

रामलीला मैदानावर उद्धव कुठली लीला दाखवायला गेले होते? लोकसभेनंतर संजय राऊत देखील तिकडे राहणार नाहीत. जेव्हा राज्यसभेत मी संजय राऊतांना भेटायचो, तेव्हा ते मातोश्रीत आणि इतर ठिकाणी काय चाललंय ते सगळं सांगायचे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संजय राऊत पक्षाशी प्रामाणिक नाहीत. शिवसेना संपविण्यात राऊतांचा हात आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...