Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयी नवी मुंबई पालिकेची बैठक, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक आयोजित केली (Navi Mumbai Municipal corporation Ganeshotsav Rules)  होती.

Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयी नवी मुंबई पालिकेची बैठक, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 11:42 PM

नवी मुंबई : येत्या 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आरोग्यपूर्ण रितीने निर्विघ्नपणे साजरा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे. या सूचनांबाबत माहिती देण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक आयोजित केली होती. यात महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय स्तरावर उत्सव मंडळांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. (Navi Mumbai Municipal corporation Ganeshotsav Rules And Regulation)

या बैठकीला बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या आठही विभागातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

घरगुती गणेशोत्सवासाठी सूचना

  • कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव उत्साहात मात्र सजावटीतील भपकेबाजपणा टाळून करावा
  • साधेपणाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क अशा सर्व सुरक्षा साधनांचा वापर करुन साजरा करण्यात यावा.
  • गणेशोत्सवातून आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
  • मंडप उभारणी सर्व प्रकारची रितसर परवानगी घेऊन करण्यात यावी.
  • श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी.
  • त्याचप्रमाणे शक्यतो घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे.
  • शाडूची / पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
  • श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत
  • आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे आणि कुटुंबियांचे साथीच्या रोगापासून रक्षण करावे.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा – Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींची उंची 4 फुटांपर्यंतच, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 10 सूचना

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना

  • नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
  • सर्व गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेच्या http://www.rtsnmmconline.com या संकेतस्थळावर गणेशोत्सवातील मंडप उभारणी करीता परवानगी अर्ज दाखल करावेत.
  • या ऑनलाईन प्रणालीव्दारे उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे या संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करण्यात येऊ नये.
  • तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ नये.
  • कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल.

या बैठकीप्रसंगी महानगरपालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थिती होते. त्याशिवाय वाहतूक पोलीस निरीक्षक, अग्निशमन अधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना सर्व मंडळांनी सद्यस्थितीचा विचार करुन सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. (Navi Mumbai Municipal corporation Ganeshotsav Rules And Regulation)

संबंधित बातम्या : 

Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन, 25 गावांच्या सरपंचांचा निर्णय

Konkan Ganeshotsava | चाकरमान्यांना खुशखबर, गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.