नवी मुंबईत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवणार, बेड्सही दुप्पट, महापालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी (Navi Mumbai Muunicipal comissioner Abhijit Bangar) 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली.

नवी मुंबईत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवणार, बेड्सही दुप्पट, महापालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई : नवी मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढवण्याला महापालिका प्रशासनाचे पहिले प्राधान्य असणार आहे (Navi Mumbai Muunicipal comissioner Abhijit Bangar). महापालिकेच्या मालकीची लॅब पुढच्या सात दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढणार असल्याची माहिती, नवी मुंबई पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. यावेळी त्यांनी नवी मुंबईत आयसीयू आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटांची क्षमतादेखील दुप्पटीने वाढवणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचे संकेतही अभिजित बांगर यांनी यावेळी दिले (Navi Mumbai Muunicipal comissioner Abhijit Bangar).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महपालिका आयुक्तांनी सांगितलेले 6 महत्त्वाचे मुद्दे :

1. कंटेन्मेंट झोनमध्ये यापुढेही लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी सुरुच ठेवणार आहोत.

2. संस्थात्मक विलगीकरण महत्वाचे आहे. या विलगीकरणकक्षांमध्ये स्वच्छता, चांगल्या गुणवत्तेचं जेवण याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

3. खाजगी हॉस्पिटलमध्ये वाढीव बिलाच्या तक्रारी वेळेत निकालात काढण्याला प्राधान्य देत आहोत. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केली असून त्याद्वारे तक्रारी निकालात काढत आहोत.

4. आयसीयू खाटांची क्षमता वाढवण्याला प्राधान्य, त्यासाठी खाजगी रुग्णालयांशी बोलणे सुरु आहे. येत्या काही दिवसात आयसीयू खाटांची क्षमता वाढवली जाणार आहे.

5. नवी मुंबईत आयसीयू आणि व्हेंटिलेटर खाटांची संख्या वाढवण्याबाबत काम जोरात सुरु आहे. महिन्याभरात आयसीयू आणि व्हेंटिलेटर खाटांची संख्या दुप्पटीने वाढवार आहे.

6. पालिका रुग्णालयात जागा नसल्याने खाजगी रुग्णालयात रुग्ण जातो. हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल लवकरच दिसेल.

हेही वाचा : अनलॉकनंतर नवी मुंबईतील 146 पोलिसांना कोरोना, कुटुंबीयही विळख्यात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI