Navnath Ban: देवाभाऊंचं शेतकऱ्यांशी नातं बॅरिकेट्सपलीकडचं, नवनाथ बन यांचं रोहित पवार यांना सडेतोड उत्तर

Navnath Ban criticized Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या दुष्काळी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून हल्लाबोल केला होता. त्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.

Navnath Ban: देवाभाऊंचं शेतकऱ्यांशी नातं बॅरिकेट्सपलीकडचं, नवनाथ बन यांचं रोहित पवार यांना सडेतोड उत्तर
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, नवनाथ बन
| Updated on: Sep 24, 2026 | 9:34 AM

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर टीका केली. बॅरिकेट्स आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता न आल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी आता शेतात बॉम्ब पिकवायला लागले का? अशी खरमरीत टीकाही रोहित पवार यांनी केली होती. त्यावर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी आघाडी काळातील काही उदाहरणांचा उल्लेख करत पवारांवर टीका केली आहे.

नवनाथ बन यांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

काल रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका केली होती. त्याला नवनाथ बन यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर छातीशी कवटाळणारे देवाभाऊ आहेत. शेतकऱ्यांच्या अश्रूंचं राजकारण करणारे रोहित पवार असल्याचा टोला त्यांनी लगावला. बांधावर जाऊन पाहणी काय असते ते देवाभाऊंकडे बघून शिका, असे प्रत्युत्तर भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले.

शेतकर्‍यांवर गोळ्या झाडणाऱ्यांनी सुरक्षेची चिंता करू नये. देवाभाऊंचं शेतकऱ्यांशी नातं बॅरिकेट्सपलीकडचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अश्रूंचा बांध फुटला, तर त्याला छातीशी कवटाळणारे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्या अश्रूंच्या प्रत्येक धारेचे राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचं नौटंकीबाज सरकार नाही. बांधावर जाऊन पाहणी काय असते ते ह्या फोटोकडे बघा, असे उत्तर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले.

मिस्टर रोहित पवार, तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांचे हात रक्तानं माखले, त्यांनी आज शेतकऱ्यांच्या सुरक्षेची चिंता करणं म्हणजे मोठा विनोद आहे, अशी सडेतोड प्रतिक्रिया बन यांनी रोहित पवार यांच्या आरोपानंतर केली.

तुम्ही काजू बदाम खा, मात्र आम्हाला आमच्या हक्काचं द्या

आमदार रोहित पवार हे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निपाणी परिसरात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा आक्रोश दिसला. हेक्टरी 50 हजार देऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. तुम्ही काजू बदाम खा, मात्र आम्हाला आमच्या हक्काचं द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन कपाशी तूर दाखवत व्यथा मांडल्या.

विभागीय आयुक्तांपुढे तक्रारीचा पाढा

मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षना घेऊन आमदार रोहित पवार यांनी काल छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त यांची भेट घेतली आम्ही शेतकऱ्यांसोबत बॅरिकीट न लावता आणि मेटल डिटेक्टर न लावता चर्चा केली. मराठवाड्यात 35 हजार कोटीचे नुकसान शेतकऱ्यांचा झाला आहे, आकडेवारी विभागीय आयुक्त यांना दिले असून, पंचनामे करण्याची मागणी केली आहे, असे रोहित पवार म्हणाले.

पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही, काही ठिकाणी खूप कमी पैसे मिळाले. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी नुकसानभरपाई देतांना सरकारने फसवले, त्यात आता दुष्काळ पडला आहे. प्रति हेक्टर 50 हजार मदत देण्यात यावी. चारा छावणी सुरू करावे, जेवढे जनावर आहेत तेवढी मदत करावी. पीक कापणी अंतर्गत फसवणूक पीक विमा कंपनी करत आहे. बीडचे 800 कोटी पीक विमा रखडले आहे. धाराशिव 2022 चे 600 कोटी शिल्लक आहे पीक विम्याचे मुख्यमंत्री यांनी उद्यापासून पंचनामे करण्याचे सांगितले, मग आम्ही आधी काय सांगितले होते, दबाव वाढल्यावर घोषणा करता, आधी तुम्ही फसवत होते का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी  केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us