नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय.

नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 1:38 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. एनसीबीला समीर खान यांनी स्वतः ड्रग्ज घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. स्वतः एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनीच याबाबत माहिती दिलीय. तसेच ठोस पुरावे असल्यानेच समीर खान यांना अटक केल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय (NCB officer Samir Wankhede inform Samir Khan consume drugs).

समीर वानखेडे म्हणाले, “करण सजनानी ड्रग कनेक्शनमध्ये समीर खान यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलवलं आणि यात त्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक केली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात वांद्रेमधून एका व्यक्तीला एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.”

“समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते मोठे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याआधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय,” असंही समीर वानखेडे यांनी नमूद केलं.

नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

हेही वाचा :

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी

ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?

सरकारवर कोणताही दबाव नाही; लवकरच सत्य बाहेर येईल: नवाब मलिक

व्हिडीओ पाहा :

NCB officer Samir Wankhede inform Samir Khan consume drugs

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.