शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात, 21 दिवसात 3 शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar admitted) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात, 21 दिवसात 3 शस्त्रक्रिया
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy hospital) रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास 21 दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.

यापूर्वी शरद पवार यांच्यावर 12 एप्रिलला  पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती.  त्याआधी शरद पवारांना 30 मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. 30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर 12 एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव (Amit Maydeo) यांनी केली होती.

नवाब मलिक यांचं ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दली. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

शरद पवारांना पोटदुखीचा त्रास 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Symptomatic Gallstones) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे 30 मार्चला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर एण्डोस्कोपी (endoscopy) केली गेली.

शरद पवार यांना नेमका कोणता त्रास होता ?

शरद पवार हे 30 मार्चला ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी त्यावेळी घेतला होता.

दुसरी शस्त्रक्रिया 

यानंतर 12 एप्रिलला शरद पवारांवर दुसरी शस्त्रक्रिया झाली होती.  15 दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावर झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया होती. त्यावेळी त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

संबंधित बातम्या 

Sharad Pawar: शरद पवार यांच्या पित्ताशयावरील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण, सध्या प्रकृती स्थिर, आगामी काळात पुन्हा ऑपरेशन

Published On - 11:17 am, Wed, 21 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI