Sharad Pawar : MIM चा प्रस्ताव राष्ट्रवादीनं धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला : शरद पवार

एमआयएमचा सोबत येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. राज्यात दोन दिवस सुरु असलेल्या चर्चा यामुळं थांबण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar : MIM चा प्रस्ताव राष्ट्रवादीनं धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला : शरद पवार
शरद पवारांनी एमआयएमचा प्रस्ताव फेटाळलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:44 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एमआयएमचे (MIM) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी दिलेल्या आघाडीचा प्रस्ताव धुडकावला आहे. शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर करत एमआयएमसोबतच्या आघाडीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एमआयएमनं महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपनं टीका करण्यास सुरुवात केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आज दुपारी एमआयएमला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं होतं. आता शरद पवार यांनी कोणत्या पक्षासोबत आघाडी करण्याचा अधिकार राज्याच्या युनिटला नसल्याचं सांगत जलील यांचा प्रस्ताव धुडकावला आहे. तर, दुसरीकडे मविआत जाण्याचा प्रयत्न सुरुचं ठेवणार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले होते. शरद पवार यांनी आमच्या दृष्टीनं हा विषय संपला असल्याचे देखील जाहीर केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

MIM चा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. एमआयएमचा सोबत येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. राज्यात दोन दिवस सुरु असलेल्या चर्चा यामुळं थांबण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षासोबत जायचं ते सांगू शकतात. मात्र, ज्या पक्षासोबत जायचं त्यांनी हो म्हटलं पाहिजे. हा  राजकीय निर्णय आहे, हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्याला तो निर्णय घ्यायचा अधिकार नाही. राष्ट्रीय समिती यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. हा आमच्या दृष्टीनं विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.  राज्याला यासंबंधीचा निर्णय घेऊ शकता हे राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही राज्यात हा निर्णय घेता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे, पण आमच्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं हा विषय संपल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 शिवसेनेनं देखील प्रस्ताव धुडकावला

उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या:

गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला…

इंग्रजी भाषा आवश्यक पण प्रादेशिक भाषा महत्त्वाच्याच, राज्यपालांचा पुन्हा मराठीचा आग्रह

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.