AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Live | शरद पवार म्हणाले, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर येथे धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर निशाणा साधला.

Sharad Pawar Live | शरद पवार म्हणाले, 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली'
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 05, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक नेत्यांनी भाषण केली. विशेष म्हणजे या बैठकीला शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. या बैठकीत भाषण करताना शरद पवार यांनी नाशिकमध्ये काल घडलेल्या घडामोडीवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा आपण काँग्रेस पक्षाचं कार्यालय आपल्या हातात होतं पण ती काँग्रेसची प्रॉपर्टी होती. त्यामुळे आम्ही त्या कार्यालयावर ताबा मिळवला नाही. पण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर काल जो प्रकार घडला त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आपल्या भाषणातून चांगलंच सुनावलं.

“काँग्रेसमध्ये आम्ही लोकं होतं. आम्ही नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही काँग्रेसचं भवन सोडून दिलं. कारण ती संपत्ती काँग्रेस पक्षाची होती. ती आम्ही हिसकावून घेण्याची आवश्यकता नव्हती. आमच्या हातात होती. नाशिकला काय झालं? काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात, ताब्यात घेतात आणि सांगतात, हा पक्ष आमचा. ही घड्याळाची खूण आमची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“ठिक आहे, तुम्ही सांगू शकता. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कुणाला दिली? ही सगळ्या देशाला माहिती आहे. तुमच्यासाठी सांगतो, कोण कुठे जाणार नाही”, असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. तसेच यावेळी शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असे म्हणाले.

‘चिन्ह घेऊन जात असाल तर….’

“माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अनेक निवडणुका लढलो. १९६७ साली मी पाहिली निवडणूक लढवली तेव्हा माझी खूण बैलजोडी होती. त्यानंतर काँग्रेसचे दोन भाग झाले. इंदिरा काँग्रेस आणि इतर काँग्रेस. त्यामध्ये आमची खूण गेली. मग आमची गाय-वासरु खूण आली. त्यानंतरच्या काळात चरखा आला. त्यानंतरच्या काळात हात आला आणि आता त्यानंतर घड्याळ आला”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“बैलजोडीवर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय-वासरुवर लढलो, घड्याळवर लढलो. कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कुणी काही सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. चिन्ह जाणार नाही. जाऊ देणार नाही. पण चिन्ह घेऊन जात असाल तर कोणतंही चिन्ह असूद्या, जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका चोखंदळ आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला