AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न

काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने थेट ट्विटर इंडियालाच घेरलं आहे. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न
rahul gandhi
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने थेट ट्विटर इंडियालाच घेरलं आहे. तुमची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे? ते एकदा जाहीरच करा, असा कळीचा प्रश्नच राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा सवाल केला आहे. ट्विटरने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे. ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

केंद्राच्या दबावाखालीच काम

मागील काही दिवसांपूर्वी ट्विटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोस्ट ब्लॉक करणार आहे. किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्विटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी ट्विटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्विटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

शाहु- फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष

दरम्यान, मलिक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार मलिक यांनी केला आहे.

ते वक्तव्य अज्ञानातून

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा चिमटाही त्यांनी काढला. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहीत नसावा, राज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर

(ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.