AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षांचा महानिकाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील निकाल वाचनास सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल वाचत आहेत. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नेतृत्व रचना, पक्षीय घटना व विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल. यामध्ये पक्षीय घटना आणि नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षांचा महानिकाल
sharad pawar
| Updated on: Feb 15, 2024 | 5:23 PM
Share

विनायक डावरूंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर निर्णय देण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलं आहे. आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवार हे कधीपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते? तसेच राष्ट्रवादीत कधी दोन गट पडले? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादा यांचाच असल्याचा ऐतिहासिक निकालही राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे, असं सांगतानाच जून 2023 पर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामाही मागे घेतला होता, असं राहुल नार्वेकर यांननी म्हटलं आहे. अजित पवार गट मूळ राजकीय पक्ष आहे. संख्याबळाच्या आणि पक्षीय संरचनेच्या दृष्टीने अजितदादा यांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

दोन्ही गटाचा पक्षावर दावा

खरी राष्ट्रवादी कुणाची? हा प्रश्न आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला पक्ष कुणाचा हे पक्षाचे संविधान, विधिमंडळातील संख्याबळ यावर ठरवले जाते. त्यानुसारच आजचा निकाल दिला जाणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

घटनेबाबत वाद नाही

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. राष्ट्रवादीच्या घटनेबाबत काहीच वाद नाही. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. अध्यक्ष, वर्किंग कमिटी आणि नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक पद्धत दर्शवते, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार गटाने प्रतिनिधी निवडल्याचे कोणतेच पुरावे दिले नाहीत, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

त्यांना मान्यता नाही

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात 16 कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...