AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे सरकार केवळ नाममात्र”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

सरकार जेव्हा स्थापन झाल्यावर 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहत आहेत. योग्य ते निर्य होऊ शकत नाही.

हे सरकार केवळ नाममात्र;राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 29, 2023 | 8:58 PM
Share

मुंबईः लव्ह जिहादबद्दल राज्यात किंवा देशात जन आक्रोश मोर्चा काढला जातो आहे. लव्ह जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे परंतु काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणूक जवळ आल्या की, अस काहीतरी करतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे हे प्रयत्न असू शकतात अशीही टीका केली जाते आहे.

सध्याच सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर हे सरकार अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वय नसल्याची टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाहीत. तर सी सर्व्हे समोर आला आहे.

या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीस ते चौवेचाळीस जागा मिळतील असंही समोर आलं आहे. तर राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे त्यावर आधिरीत असा हा सर्व्हे आहे.

सध्याच सरकार अस्थिर आहे, मात्र सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यामध्ये समन्वय नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडणे आणि सर्वांना एकत्र करणं हा खटाटोप करण्यात आला आहे अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांच कर्ज आहे.

सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असंच दिसून येतं आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार जेव्हा स्थापन झाल्यावर 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहत आहेत. योग्य ते निर्य होऊ शकत नाही.

जनसंपर्क कमी पडत आहे. सर्व आमदार शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळात येण्यास इच्छूक आहे कोणाला घ्यावे हा पेच असल्यामुले विस्तार होत नाही.

एकदा विस्तार होऊ द्या, यातील असंतोष आपोआप उफाळून येईल, मला का डावलल या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार