“सध्या जे सर्व्हे येत आहेत, त्यामध्ये तथ्य वाटत नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजप-शिवसेनेच्या सर्व्हेला कमी लेखलं…

आमदार जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात अनेक प्रकारचे सर्व्हे केले जात आहेत. मात्र लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर केलेले काम त्या त्या नेत्यासाठी महत्वाचे असते.

सध्या जे सर्व्हे येत आहेत, त्यामध्ये तथ्य वाटत नाही; राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजप-शिवसेनेच्या सर्व्हेला कमी लेखलं...
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 8:35 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातवर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीमुळे गदारोळ उडाला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा लोगो असलेली एक जाहिरात माध्यमामधून प्रसिद्ध झालेली. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात छापून आल्यानंतर भाजपला डिवचल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. कारण त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांनी या जाहिरातीवर बोलताना मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याची टीका केली गेली.

त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र त्या झालेल्या सर्व्हेला मात्र महत्व न देता, त्या सर्व्हेमध्ये काही तथ्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

स्थानिक पातळीवर चर्चा

आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या जाहिरातीविषयी आणि त्या सर्व्हेविषयी बोलताना मात्र राजकारणाविषयी होत असलेले सर्व्हेतून कोणत्याही प्रकारचे सत्य परिस्थिती येत नसून तथ्यहीन राजकारणाविषयी विश्लेषण केले जाते असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. राष्ट्रीय पातळीवरून हा सर्व्हे झाला असला तरी त्या स्थानिक पातळीवर केलेले काम आणि त्याचा केलेला सर्व्हे हा महत्वाचा आहे असंही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सर्व्हेमधून तथ्य नाही

आमदार जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात अनेक प्रकारचे सर्व्हे केले जात आहेत. मात्र लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर केलेले काम त्या त्या नेत्यासाठी महत्वाचे असते. त्यामुळे अलिकडे जे सर्व्हे येत आहेत त्यात तथ्य वाटत नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेना-भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

स्थानिक पातळीवर सर्व्हे

जयंत पाटील म्हणाले की, ज्या प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर यांचा सर्व्हे झाला आहे, त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळी स्थानिक पातळीवर सर्व्हे केला त्यावेळी हे आम्हाला त्या सर्व्हेमध्ये असं आढळून आलं की, त्यात आम्हीच आघाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे झालेल्या सर्व्हे विषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत ही माहिती मी दिली आहे असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.