Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

Sunil Tatkare On Jayant Patil: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या चर्चा समोर येत असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट झाली का, यावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं... घडलं काय?
जयंत पाटील, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Jul 16, 2026 | 12:49 PM

Sunil Tatkare On Jayant Patil: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर अजितदादा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवार राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते अशा बातम्या समोर आल्या. शरद पवारांचा पक्ष NDA सोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडण केले. पण वर्षा बंगल्यावरील खलबतांविषयी चर्चा थांबलेली नव्हती. काल जयंत पाटील यांनी तटकरे, पटेल यांच्यासोबत बैठक झाली नसल्याचा सूर आळवला. तर आज तटकरे यांनी वर्षावरील घाडमोडी समोर आणल्या. पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध मुद्यांवर सविस्तर माहिती दिली.

सुनेत्रा पवार यांना भेटीची होती कल्पना

पटेल आणि तटकरे यांनी वर्षावर फडणवीस यांची भेट घेतली. त्याची कल्पना राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती, अशी माहिती समोर आली होती. त्याचे सुनील तटकरे यांनी खंडन केले. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत. जयंत पाटील आणि आमची भेट देखील झाली नाही. त्यांचा खुलासा देखील आम्ही ऐकला. त्याच्या नगरपालिका निवडणुका अनुषंगाने भेट झाली. सुनेत्रा पवार यांनी बोलावून घेतलं असं नाही. आमच्यात चांगलं टूनिंग आहे. आम्ही सोमवारी भेटणार होतो. मी खासदार आहे. मुख्यमंत्र्यांची प्रत्येकवेळी होणारी भेट राजकीय असते असं नाही मतदारसंघातील कामे देखील असतात. ज्यावेळी राजकीय बैठका असतात त्यावेळी सुनेत्रा पवार यांना त्याबाबत माहिती असते. मी ४० वर्ष राजकारणात आहे. मला राजशिष्टाचार माहिती आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

विलिनीकरणाच्या चर्चांवर मोठी प्रतिक्रिया

गेल्या अधिवेशनात डिलिमिटेशन आलं त्यावेळी मी मतदान केलं आहे. त्यांच्या पक्षाने पाठिंबा द्यावा न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे यांच म्हणणं देखील मी ऐकलं आहे. बिलाला समर्थन करण म्हणजे एनडीए सोबत आलं असा अर्थ होतं नाही, असे तटकरे म्हणाले.

अजित पवार असताना विलीनीकरण चर्चा झाल्या. त्यावेळी त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या होत्या. त्याच वेळी अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर ह्या चर्चा पूर्णपणे त्यांनी थांबवल्या आहेत. रविवारी मी पार्थ पवार प्रफुल पटेल दिल्लीत असणार आहेत आणि सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीस बाबत उत्तर द्यायच की नाही याबाबत निर्णय घेणार आहोत. मुख्यमंत्री यांनी जी भूमिका मांडली ती एनडीए बाबत मांडली. लवकरच जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात आली आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. युवक महिला प्रदेशाध्यक्ष, युवती संघटना, मुंबई अध्यक्ष आणि महिला प्रदेश अध्यक्ष पद लवकरच भरली जातील, असे तटकरे यांनी जाहीर केले.

लावासा प्रकरणावर मोठे भाष्य

लवासा प्रकरणाचा मी एक साक्षीदार होतो. याच प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्यातला मेरिट शून्य होता . या देशाची न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे यातून दिसतं. यावेळेला जे होतं ते साहेबांनी पुस्तकांमध्ये नमूद केलेला आहे. याचा उल्लेख याचिकाकर्त्याने याचिकित केलेला होता. या सगळ्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

जयंत पाटील यांच्याशी भेट?

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही राष्ट्रवादीतील तीन बडे नेते एकत्र आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस यांच्यासोबत भेटी दरम्यान जयंतराव पाटील नव्हते. त्यांच्याशी भेट झाली नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील आले आणि आम्ही फडणवीसांकडे गेलो आणि अर्थखाते मागितले हा कुठला तर्क मांडला हेच मला कळलं नाही. जयंत पाटील यांचा याच्याशी काय संबंध? जयंतरावांनी काल त्यांची भेट कशासाठी झाली हे कालच स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. एकत्रित राष्ट्रवादीचं काम त्यांनी पाहिले आहे. ते अनुभवी नेते आहेत. ते स्वयंभू नेते आहेत. राज्याचं अर्थखातही त्यांनी पाहिलं आहे. आमच्या दोघांच्या (फडणवीस आणि तटकरे) भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वयेही, काडीमात्र काही संबंध नाही. माझी भेट माझ्या मतदारसंघातील कामानिमित्त झाली. मी अगोदरच्या दिवशी भेट मागितली. त्यादिवशी त्यांच्या कोअर कमिटीची बैठक होती. तर प्रफुल्ल पटेल यांना बाहेर जायचे होते, त्यामुळे तेही सोबत आले, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Follow Us