AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे मुंबईवरील हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात लढले, त्यांना तुम्ही माफिया म्हणता? नांगरे पाटलांवरच्या टिकेचा ठाकरेंकडून समाचार

ज्यावेळी अतिरेकी घुसले होते तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करत त्यांच्या सोबत पोलीस लढत होते. त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

जे मुंबईवरील हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात लढले, त्यांना तुम्ही माफिया म्हणता? नांगरे पाटलांवरच्या टिकेचा ठाकरेंकडून समाचार
जे मुंबईवरील हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात लढले, त्यांना तुम्ही माफिया म्हणता?
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 8:47 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना माफिया म्हणणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. 26 नोव्हेंबरला जो अतिरेकी हल्ला मुंबईवर झाला होता. कशाला आपण ते स्मृतीदिन साजरे करायचे. ओंबळे गेले करकरे, कामटे गेले. ज्यावेळी अतिरेकी घुसले होते तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करत त्यांच्या सोबत पोलीस लढत होते. त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (News from Uddhav Thackeray criticizing Nangre Patil at Shiv Sena Dasara melava)

इथे नांगरे पाटिल आहेत. असे एक नाही अनेक पोलीस आहेत. एक गोळी त्यांच्या हृदयाचा किंवा छातीचा छेद घेऊ शकली असती, मात्र त्यांनी पर्वा केली नाही. जसा सैनिक तिथे सीमेवर लढतो त्याच हिमतीने, त्याच जिद्दीने लढणारे हे माझ्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. पण अतिरेक्यांबरोबर लढणारे हे पोलीस केवळ तुम्हाला बोंबाबोंब करायला चालतात. होळीला वेळ आहे अजून. तुमचा 24 तास शिमगा असेल तर मी काही करु शकत नाही. आमच्याकडे सणवार असतात. कधी गणपती असतात, कधी नवरात्र असते, कधी दिवाळी असते. पण काहींच्या घरी कायम शिमगा असतो. मग शिमगा करायला जाता म्हणून तुम्हाला अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया मग त्या अखिलेश यादवला त्यांच्या घराजवळ अडवलं, प्रियांकाना अडवलं, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं. अखिलेश यादवच्या घरी फक्त रणगाडे आणणं शिल्लक होतं. सगळा पोलीस बंदोबस्त लावला होता. मग जर माझे महाराष्ट्राचे पोलीस माफिया आहेत मग उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारत भूषण, भारतरत्न आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काय येता

ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून येऊ नका. समोरा समोर या, असा इशारा त्यांनी दिला.

उत्तर प्रदेशात काय मळा फुलला का?

महाराष्ट्रात काही घडलं तर गळा काढायचा. लोकशाहीचा खून झाला. महाराष्ट्रात काही घडलं तर गळा काढता. उत्तर प्रदेशात काय मळा फुलला काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?

सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?, असा सवाल त्यांनी केला. (News from Uddhav Thackeray criticizing Nangre Patil at Shiv Sena Dasara melava)

संबंधित बातम्या

मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

उद्धव ठाकरेंचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा, मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक? भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.