उद्धव ठाकरेंचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा, मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक? भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारा

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. ते फोडण्याचे-पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. मी तर आजसुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करून पडत नाही. आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकला की काटा काढायचा. हे जास्त थेरं चालू शकत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

उद्धव ठाकरेंचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा, मुंबई पालिकेसाठी 'बंगाल पॅटर्न' राबवण्याची हाक? भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारा
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 8:16 PM

मुंबईः शिवसेनेच्या आज झालेल्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. स्वातंत्र्य लढ्यातील पश्चिम बंगालच्या योगदानाचे दाखले देत उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक दिलीय. भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.

आपलं सरकार फोडण्याचे-पाडण्याचे अनेक प्रयत्न केले

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. ते फोडण्याचे-पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. मी तर आजसुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करून पडत नाही. आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकला की काटा काढायचा. हे जास्त थेरं चालू शकत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवू

हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता. त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल, बाल आणि पाल पुढे होता, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब एक पुढे होता आणि पश्चिम बंगाल एक पुढे होता. बंगालनं त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. खरोखर ममतादीदी आणि बंगाली जनतेला मी धन्यवाद देतोय. तुम्ही ती न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. तीच जिद्द आपल्यासुद्धा रगामध्ये आणि रक्तामध्ये आहे ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय.

तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?

पण आलीच तर दाखवावेच लागेल. मग हा सत्तापिपासूपणा नाही आहे काय?, वैचारिक लढा ठीक आहे, पण यात कुठला विचार आहे. तोंडामध्ये बोंडक घालून शिवसेनेला बदनाम करणारी लोकं बसली असतील. 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते, बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही

केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला. त्याच्यावर आरोप करताय. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गांधी आणि सावरकर तरी समजले का?

सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं. संबंधित बातम्या:

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट

Uddhav Thackeray LIVE : तर मी राजकीय जीवनातून बाहेर पडलो असतो, ‘त्या’ दगाबाजीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.