IAS Transfer: चार दिवसात निधी चौधरींची दुसऱ्यांदा बदली; आता मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

तळीयेतील दुर्घटनेनंतर निधी चौधरी यांची बदली करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वीच मुंबईच्या आयटी संचालकपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. (Nidhi Chaudhary)

IAS Transfer: चार दिवसात निधी चौधरींची दुसऱ्यांदा बदली; आता मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
Nidhi Chaudhary
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:34 PM

मुंबई: तळीयेतील दुर्घटनेनंतर निधी चौधरी यांची बदली करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वीच मुंबईच्या आयटी संचालकपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या चारच दिवसात त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती उपनगरच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. (Nidhi Chaudhary appointed as Collector of Mumbai Suburban District)

महाडमधील तळीयेतील दुर्घटना झाल्यानंतर निधी चौधरी यांची दिनांक 20 ऑगस्ट रोजी बदली करण्यात आली होती. रायगडच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांना थेट मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आज निघालेल्या ऑर्डरनुसार त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांची थेट मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डांगेंच्या हाती महाराष्ट्र सदन

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एमडी जयश्री भोज यांची एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. निरुपमा डागे यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्तपदी तर मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची पर्यटन विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तळीयेत नेमकं काय घडलं?

जुलैमध्ये महाडमध्ये झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली होती. 22 जुलै रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली होती. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत होते. (Nidhi Chaudhary appointed as Collector of Mumbai Suburban District)

संबंधित बातम्या:

IAS Transfer : निधी चौधरींची मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती, रायगडचे नवे जिल्हाधिकारी कोण?

Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज

VIDEO | 11 प्रवाशांचा जीव धोक्यात घालत वाहत्या पाण्यातून बस दामटवली, आणि…

(Nidhi Chaudhary appointed as Collector of Mumbai Suburban District)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.