AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे ड्रग्सचं सेवन करतात, नितेश राणे यांचा गंभीर आरोप; मोठी खळबळ

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर ड्रग्स सेवनाचा गंभीर आरोप केला आहे. दिशा सालियन प्रकरणात नार्कोटिक्स विभागाकडे याबाबत चॅट असल्याचे ते म्हणाले. राणेंनी आदित्य यांच्या आंदोलनावर टीका करत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडल्याचे म्हटले. त्यांनी ठाकरेंवर 'व्होट जिहाद'ला पाठिंबा देत बांगलादेशींना मतदानाचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप केला.

आदित्य ठाकरे ड्रग्सचं सेवन करतात, नितेश राणे यांचा गंभीर आरोप; मोठी खळबळ
Nitesh Rane Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 1:37 PM
Share

आदित्य ठाकरेंना काल पोलिसांच्या व्हॅनवर उभं राहून ओरडताना पाहिलं. कदाचित काल त्यांनी जास्त जोरात मारलं असेल, म्हणजे ओढलं असेल. दिशा सालियन केसमध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे आदित्य ठाकरे हे ड्रग्सचे सेवन करतात, असे काही चॅट आहेत. त्याचा इफेक्ट कालच्या आंदोलनात दिसत होता. पोलिसांनी त्यांची ड्रग्स टेस्ट केली असती तर दिसून आलं असतं. काल उगाच पेंग्विन कशाला उड्या मारत होता हेही समजलं असतं, असा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून कमी बसा, असा माझा अमित ठाकरेंना सल्ला राहिल. कारण आदित्यच्या संगतीचा असर काल दिसत होता. इफेक्ट दिसत होता. आदित्य ठाकरे काल जास्तच मारून आल्याचं दिसंत होतं, असा दावा नितेश राणे यांनी केला.

ठाकरे झाले वाकरे

दोन्ही ठाकरे वाकरे झाले आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात नेहमी कडक भूमिका घेतली. त्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू द्यायचा नाही, अशी भीती निर्माण केली होती. तेव्हाचे बाळासाहेब ठाकरे आणि आताच्या या वाकऱ्यांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे, असं नितेश राणे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार रसातळाला

आताचे वाकरे मतदार यादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची नावे राहावीत, त्यांनी आपल्या देशात येऊन मतदान करावं, जेणे करून व्होट जिहाद करून यांचे खासदार निवडून येतील यासाठी झटत आहेत. मोहल्ल्यातून त्यांना 50 ते 70 टक्के मतदान झालं आहे. या वाकऱ्यांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं काही पडलं नाही. ते एवढे त्यांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी बाळासाहेबांचे विचार रसातळाला आणले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आधी आमदारांचा राजीनामा घ्या

लोकशाहीच्या विरोधात बोलून आणि व्होट जिहादला समर्थन केलं जात होतं. राज्यातील जनता हे सर्व पाहत आहे. एसआयआरवर एवढा आक्षेप होता तर लोकसभेनंतर तुमचे थोबाड का बंद होते? आदित्य ठाकरेंनी वरळीतून राजीनामा द्यायचा होता. दादरचा आमदार महेश सावंतनेही राजीनामा द्यायचा होता. स्वत:चे खासदार मोहल्ल्यातून निवडून येत असताना यांचे थोबाड उघडले नाही? आता मात्र आक्षेप घेत आहेत. विधानसभा आणि बीएमएसीच्या निवडणुकीत यांना लोकांनी नाकारलं. त्यामुळे तुम्ही एसआयआरवर बोट दाखवत असाल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या. तुमच्या उरलेल्या आमदारांचा राजीनामा घ्या, असं आव्हानच राणे यांनी दिलं.

Follow Us
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....