नितेशने जपून बोलावे…भावाने करून दिली युती धर्माची आठवण, तर निलेश राणे यांना मिळाले असे उत्तर

Nilesh Rane on Nitesh Rane : मंत्री नितेश राणे हे बेधडक वक्तव्यासाठी परिचित आहेत. ते सध्या भाजपची मुलूख मैदान तोफ म्हटले तरी वावगे नाही. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतच तडे जातील की काय अशी भीती काहींना वाटते. त्यांचे बंधु आणि आमदार निलेश राणे यांनी त्यांना असा सबुरीचा सल्ला दिला आहे.

नितेशने जपून बोलावे...भावाने करून दिली युती धर्माची आठवण, तर निलेश राणे यांना मिळाले असे उत्तर
शाब्दिक वॉर
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 08, 2025 | 2:01 PM

तर मंत्री नितेश राणे हे आक्रमक वक्तव्यासाठी राज्यात ओळखले जातात. ते भाजपाचे जणू फायर ब्रँड नेते असल्याचे चित्र आहे. हिंदूत्व आणि इतर मुद्दावर त्यांची वक्तव्य ही बेधडक आणि तितकीच जहाल असतात. त्यांच्या या धारदार शब्दांचा त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांना पण त्रास होतो. त्यांनी वक्तव्य केल्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला त्यावर सारवासावर करावी लागते. आता त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या मित्र पक्षांना चांगलेच झोंबले आहे. त्यावर त्यांचे बंधू आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना सबुरीचा असा सल्ला दिला आहे.

‘सगळ्यांचा बाप’ या वक्तव्याने अस्वस्थता

मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे सेनेला शिंगावर घेतले. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या कालच्या वक्तव्याने महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.’नितेशने जपून बोलावे’ असा कानमंत्रच घरातून मिळाल्यावर नितेश राणे हे घोडं आवरत घेतील अशी अपेक्षा सगळेच व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे निलेश राणेंच्या या आवाहनानंतर नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिसाद दिला आहे.

काय म्हणाले नितेश राणे

‘नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींच भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.’ असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.

निलेशजी तुम्ही tax free

अर्थात नितेश राणे हे काही मागे पाऊल टाकण्याच्या विचारात दिसले नाही. त्यांनी भावाच्या ट्विटला एक्सवरूनच उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने आता भाजप-सेनेतील शीतयुद्ध वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नितेश राणे यांनी ट्विट केले की, ‘निलेशजी तुम्ही tax free आहात.’