भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं: राजेंद्र शिंगणे

भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. | Remdesivir injection Rajendra Shingne

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:06 AM, 21 Apr 2021
भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं: राजेंद्र शिंगणे
डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न वऔषध प्रशासन मंत्री

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद रंगला आहे. आम्ही ब्रूक फार्माकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स (Remdesivir injection) विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध खात्याचे (FDA) मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत होते. मात्र, डॉ. शिंगणे या सगळ्यावर काय खुलासा करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. (Some people from BJP had approached me to buy Remdesivir from their supplier says FDA Minister Rajendra Shingne)

अखेर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी रात्री एक व्हीडिओ ट्विट करत आपली भूमिका मांडली. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. भाजप रेमडीसीविर विकित घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोसिएल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपचे नेते यावर काय बोलणार, हे आता पहावे लागेल.

भाजपमधील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. शिंगणे यांनी दिला.

रेमडिसिविरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तरदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

VIDEO: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस ठाण्यात, पोलीस अधिकाऱ्यांना का घेतलं फैलावर?; वाचा, सविस्तर

रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी

(Some people from BJP had approached me to buy Remdesivir from their supplier says FDA Minister Rajendra Shingne)