AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुवाहाटी नव्हे, थेट… ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडताच कुठे गेले नवस फेडायला? इकडे धाराशिवमध्ये…

Omraje Nimbalkar - Shrikant Shinde: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मनातील इच्छा पूर्तीसाठी गुवाहाटी गाठली नाही. त्यांनी कामाख्या देवीचेही दर्शन घेतले नाही. तर या मंदिरात 11 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नवस फेडला.

गुवाहाटी नव्हे, थेट... ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडताच कुठे गेले नवस फेडायला? इकडे धाराशिवमध्ये...
ओमराजे निंबाळकर, श्रीकांत शिंदे Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 27, 2026 | 2:20 PM
Share

Omraje Nimbalkar – Shrikant Shinde At Tirupati Balaji Temple : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ठाकरे सेना सोडण्यापूर्वी मोठा ड्रामा झाला. पुणे ते धाराशिव असा लांबलेला निर्णय, त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा आणि नंतर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. निंबाळकरांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रि‍पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांनी देवदर्शन केले. ते गुवाहाटीला गेले नाहीत. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे देवदर्शनासाठी तिरुपती बालाजीला पोहचले. याठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी नवस फेडला.

11 किमीपर्यंत चालत फेडला नवस

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यासाठी तिरुपती ते तिरुमला डोंगर ते 11 किमीपर्यंत चालत गेले. या दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट झाले आहेत आणि शेअरही झाले आहेत. श्रीकांत शिंदे आणि निंबाळकर यांची नावे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोघांच्याही देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

यावेळी या दोघांसोबत खासदार श्रीरंग बारणे, निलेश देशमुख, चंद्रहार पाटील, खासदार ओमराजे यांचे बंधू आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी आज सकाळीच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी विजयवाडा येथे कन्यका देवीचे दर्शन घेतले. या खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा प्रवास केला. पैलवान चंद्रहार पाटील यांनी ति‍र्थाटनाचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत.

3800 पायऱ्या चढत दर्शन

चंद्रहार पाटील यांनी या देवदर्शनाचे फोटो आणि माहिती शेअर केली. 25 जून रोजी ही सर्व राजकीय मंडळी आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी पोहचले. रात्री 10 ते 2.30 वाजेपर्यंत 3800 पायऱ्या चढून जवळपास 11 किलोमीटरेच अंतर त्यांनी पायी चालत गाठले. त्यानंतर ही मंडळी पहाटे दर्शन घेतले. या ठिकाणी आता त्यांनी कोणता नवस फेडला याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर या दोघांना केंद्रात मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अगोदरच एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. तर येत्या काही दिवसात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची आणि काही पक्षांच्या खासदारांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात याविषयीचे चित्र स्पष्ट होईल.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार