AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: मुलीची सोयरीक जुळवता जुळवता… उद्धव ठाकरे यांचा संजय देशमुखांवर यॉर्कर, म्हणाले गाढवाचं…

Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh: खासदारांनी बंडाळी करत शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे हे त्यांचा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. त्याची सुरुवात वाशिम-यवतमाळ मतदार संघापासून झाली. खासदार संजय देशमुखांवर त्यांची तोफ धडाडली.

Uddhav Thackeray: मुलीची सोयरीक जुळवता जुळवता... उद्धव ठाकरे यांचा संजय देशमुखांवर यॉर्कर, म्हणाले गाढवाचं...
उद्धव ठाकरे, संजय देशमुखImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 27, 2026 | 1:33 PM
Share

Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh: खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू झाला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात त्यांची आज तोफ धडाडली. त्यांनी या भागाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. या खासदारांनी जनतेच्या मताचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी संजय देशमुख यांचा किस्सा त्यांनी सांगितला.

स्वतःचीच सोयरीक जुळवली

यवतमाळ येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा समाचार घेतला. फुटीपूर्वी नेमकं काय झालं याची माहिती त्यांनी सबेत दिली. “दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. ते म्हणाले मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वताची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं.” असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला.

गेले सासरी, आता नांदा तिकडे,. गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे लादलं जाईल ते वाहत राहा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर केली. शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. त्याच्या जीवावर सर्व आहेत. मी लढणार आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही. आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणार आहे. मंदीर लुटणारं नाही असे ते म्हणाले.

गद्दारांना जाब विचारा

हा गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा. मी निवडून आणलं, का गद्दारी केली. मला पैसे मिळाले असते तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला जागलो. निष्ठेला जागलो. तू बोल का गद्दारी केली. असं विचारा. पुढचे तीन वर्ष हा कार्यक्रम करावा लागेल, असा कार्यक्रमच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

निवडणुका नसतानाही फोडाफोडी केल्या जात आहे. हा काळ असा त्यांनी निवडला. लोकसभेला आलो होतो. त्यांची घोषणा होती अब की बार ४०० पार. मी म्हणालो होतो, अब की बार तडीपार. त्यांना संविधान बदलायचं आहे. फोडाफोडी करायची आहे. घटनेत बदल केला की पाहिजे ते करता येईल. गुलामगिरी आणि हुकूमशाहीची राजवट रोखण्यासाठी आपण मैदानात आहोत. बाकी राज्य उठतील तेव्हा उठतील. पण महाराष्ट्र जागा राहणार की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हे काम सोपं नाहीये. त्याने गद्दारी का केली. तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आहे. पुढचा खासदार भगव्याचा कट्टर असला पाहिजे. शिवसेना एकच आणि भगवा एकच. दोन किंवा तीन वर्षाने जेव्हा निवडणुका होईल तेव्हा आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी