एक तोळा सोनं, लय भारी मिठाई, जेलर नातेवाईक… अमरावतीच्या तुरुंगात काय काय घडलं? दमानियांच्या आरोपाने सुपेकर अधिकच गोत्यात?
Anjali Damania on Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे अडचणीत आले असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नव्या आरोपांनी ते अधिकच गोत्यात आल्याचे समोर येत आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात अनेक अँगल समोर येत आहे. त्यात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे अडचणीत आले असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नव्या आरोपांनी ते अधिकच गोत्यात आल्याचे समोर येत आहे. दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अमरावती तुरुंगात सुपेकरांना काय काय केले याविषयीचे दावे त्यांनी केले आहेत. त्यांनी सुपेकरांची रेट लिस्टच सांगितली आहे.
सुपेकरांची नवीन रेट लिस्ट
अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, काल अशी बातमी होती की एक गुन्हेगार पुण्याच्या जेलमध्ये येरवडा जेलमध्ये होते त्याला तिथून अमरावतीला हलवण्यात आलं. आणि तिथे जाऊन सुपेकर त्यांना भेटले अशी माहिती आली होती. त्यांच्याकडून 500 कोटी रुपये त्यांनी मागितले.
मी त्यांच्याकडून खात्री करून घेतली तर त्यांचा असं म्हणणं होतं की जेव्हा सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले ते म्हणाले तुझ्याकडे दीड हजार कोटीची संपत्ती आहे हे मला माहिती आहे. मग त्यातले जर साडेपाचशे कोटी तू मला देशील तरच तो जेल मधून बाहेर येशील नाही तर इथे सडत राहील
साडे तीन तास हे त्या जेलमध्ये बसून होते आता अशी देखील माहिती मिळते की अमरावतीचे तिथले जे जेलर होते ते सुद्धा या सुपेकरांचे नातलग होते असं त्यांनी मला सांगितलंय आता मी ती पण चौकशी करणार आहे की ते नातलग म्हणजे नेमके कोण होते.आता या सगळ्या गोष्टींनी रोज नवनवीन खुलासे होतात.
काल मला अजून एका केस ची माहिती मिळाली आहे.. प्रत्येक PI कडून ते पैसे घ्यायचे ते दिवाळीला एक तोळं सोनं घ्यायचे आणि जळगावची मिठाई लय भारी असल्याने खरेदी करायचे. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय सिरीयस आहेत आणि गृहमंत्र्याला मी याच्याबद्दल पण पत्र येणार आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
बीडमध्ये सिनेस्टाईल मारहाण
बीडमध्ये रोज असं मारामारीची घटना येतात. तिथल्या मला असं वाटतं आमदार खासदारांना आपल्या डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे. कराडला धनंजय मुंडेंनी मोठा केला. पालकमंत्री काय करतील असं मला काही विशेष वाटत नाही. कारण त्यांच्या पुण्यामध्ये अनेक वर्ष पालकमंत्री आहेत पण पुण्यात घटना अशा वाढतच चालले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून फार काही होईल असं वाटत नाही, असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. पण SP आणि कलेक्टर दोन्ही चांगले ऑफिसर आहेत त्याच्यावर काहीतरी नक्कीच करतील असं वाटतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निलेश चव्हाणला शस्त्र परवाना
त्यांच्यावर अनेक सिरीयस ऑफेन्सेस असताना त्यांना हा शस्त्र परवाना कसा मिळाला? कारण त्याच्यात अनेक गुन्हे लपवून ठेवण्यात आले अशी माहिती मिळते तर आत्ताच्या घटकाला मला असं वाटतं याचा सगळा खुलासा या पूर्ण चौकशीनंतर बाहेर येईल यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शशांक हगवणे आणि लता हगवणे प्रकरण
आता कसं झालं होतं की त्यांचा एक जेसीबी एका माणसाने विकत घेतला पाच लाख रुपये महिना तो त्याला ते देखील होता आणि बाकीचे तर बँकेचे असतेत तेथे बँकेचे हप्ते पण तो फेडत होता असं असताना एका दिवशी येऊन तो जेसीबी उचलून घेऊन गेले आणि तो विचारा माणूस लढतोय गेले कितीतरी वर्ष तर मला असं वाटतं ते आता खुलासा असा झालाय की बँकेने तो जप्त केलेलाच नव्हता तीन खोटे व्यक्ती उभे करून त्यांनी तो जेसीबी बँकेचे आहेत असं सांगून नेलं तर मला हे अतिशय सगळं धक्कादायक वाटते, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.
छगन भुजबळ पासपोर्ट
त्यांचं पूर्ण कुटुंब मला वाटतं 17 जण आत्ता बाहेर आहेत असं मी ऐकलं तर त्याच्यात आधी कसं झालं त्यांचा पासपोर्ट ED मध्ये जमा होतात. चार दिवसाची वाढीव हे कोर्टाकडून मागितले होते परत तेच सांगितलं त्यांचा स्टॅंडर्ड डायलॉग हे कुठे पळून जातील पण मंत्री असे पळून जात नाही केल्यानंतर त्यांना तो वाढलेला अवधी दिला गेला पण हे सगळं बघून खूप दु:ख होतं, असल्याचे दमानिया म्हणाल्या.
