Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज आंदोलनानंतर प्रथमच होणार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार, कामावर हजर असणाऱ्यांनाच मिळणार वेतन

जे एसटी कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच वेतन देण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. परब यांच्या या इशाऱ्यानंतर आज कामावर हजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

आज आंदोलनानंतर प्रथमच होणार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार, कामावर हजर असणाऱ्यांनाच मिळणार वेतन
अनिल परब
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 12:44 PM

मुंबई : विलिनिकरणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पगार वाढ केल्यानंतर देखील काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 19 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. दरम्यान जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल,असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

250 पैकी 105  आगार सुरू

कर्मचारी आता हळूहळू कामावर येऊ लागले आहेत. राज्यातील 250 पैकी 105  आगार सुरू झाले असून, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 19 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले  होते. परब यांच्या आवाहानाला कर्मचारी चांगला प्रतिसाद देत असून, सोमवारी राज्यभरात एसटीच्या 1700 पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामधून एक लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करावे, वेतनवाढ करावी, वेतन वेळेत द्यावे, महागाई भत्ता वाढवावा अशा अनेक मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. यातील वेतनवाढीच्या मागणीसह अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील काही एसटी कर्मचारी हे विलिनिकरणावर आडून बसले आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर आता सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

Obc : ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचं षडयंत्र, फडणवीसांचे लोक कोर्टात का जातात? भुजबळांचा सवाल

St worker strike : एसटीचा संप मिटता मिटेना, निलंबन आणि दगडफेकीने एसटी कर्मचारी हैराण

New delhi : गाडी थांबवायला सांगितल्यावरही थांबवली नाही, त्यामुळे दुर्घटना, नागालँड गोळीबारावर शहांचं उत्तर

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.