Saroj Patil : आमचा रोहितही धीट झालाय, अजितदादां समोरच आत्याची कौतुकाची थाप, म्हणाल्या अजित वरतून नारळासारखा, पण…

Saroj Patil : सांगलीत आज पवारांच्या तीन पिढ्या एकाच मंचावर आल्या. सरोज पाटील, माईंनी अजितदादा आणि रोहित पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. माई म्हटल्यावर मायेचा उमाळा आलाच. त्यांनी कुठलाही भेद न ठेवता मन मोकळं केलं. त्यांच्या या भाषणाची राज्याच चर्चा सुरू आहे.

Saroj Patil : आमचा रोहितही धीट झालाय, अजितदादां समोरच आत्याची कौतुकाची थाप, म्हणाल्या अजित वरतून नारळासारखा, पण...
सरोज पाटील यांच्याकडून कौतुकाची थाप
| Updated on: Aug 16, 2025 | 12:34 PM

कोल्हापूरात सकाळीच अजितदादांनी रोहित पवारांचा क्लास घेतला. त्यांनी उगाच आमच्या पक्षात नाक खूपसू नये आणि फुकटचा सल्ला देऊ नये असे ठणकावले. तर सांगलीत एका कार्यक्रमानिमित्त पवारांच्या तीन पिढ्या एकत्र आल्या. सरोट पाटील, अजितदादा आणि रोहित पवार एकाच मंचावर आले. त्यावेळी सरोज पाटील यांनी अजितदादा आणि रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांच्या कौतुकाच्या थापेने रोहित पवार यांचे मुठभर मास तर नक्कीच वाढले असेल यात शंका नाही.

आमचा रोहित धीट झाला

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी.पाटील विधी महाविद्यालय, सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्धघाटन सोहळा दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सरोज पाटील यांनी आपल्या भाषणात अजितदादा आणि रोहित पवार यांच्यावर शब्द सुमनं उधळली. त्यात अर्थात मायेचा ओलावा होता. आत्याचे प्रेम यावेळी दिसून आले. आजीचे प्रेमही दिसले.

या मंचावर आणखी एक हिरा उपस्थित आहे. तो म्हणजे आमचा लाडका रोहित पवार. रोहित आता चांगलाच धीट झाला आहे. चांगल्या पद्धतीने भाषण देऊ लागला आहे. तो आता प्रा. एन. डी. पाटील यांची जागा घेतो की काय असं वाटतं. त्यावेळी मंचावर अजित पवार यांच्यासह अनेक सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.

संकट आलं त्यावेळी अजित धावून आला

अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे. ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं, त्यावेळी अजित धावून आला, अशी कौतुकाची थाप आत्यांनी दिली. अजितदादांची कोणती तारीख घ्यायची असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर आमचा प्रशांत दादांकडे गेला. लगेच दादांनी तारीख दिली. अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे, असे कौतुक सरोज पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली.