एसटीच्या नव्या बसेसमध्ये पॅनिक बटणची सुविधा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या पाच ते सहा हजार बसेसचे आयुष्य संपल्याने एसटीने आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या सातशे बसेसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसची काय आहेत, वैशिष्ट्य ते पाहूयात..

एसटीच्या नव्या बसेसमध्ये पॅनिक बटणची सुविधा
BS-6Image Credit source: BS-6
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 6:58 PM

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नव्या टाटा मेकच्या बीएस – 6 दर्जाच्या बसेसच्या बांधणीचे काम हाती घेतले आहे. अशा सातशे बसेसची बांधणी एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत  सुरू असून या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. या बसेस सुरूवातीला लांबपल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. काय आहेत या नव्या बसेसची वैशिष्ट्ये पाहूयात…

एसटी महामंडळाने सातशे नवीन बीएस – 6 दर्जाच्या बसेसची बांधणी आपल्या दापोडी ( पुणे ) , चिकलठाणा ( औरंगबाद ) आणि हिंगणा ( नागपूर ) येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू केली आहे. या बसेस लांबपल्ल्यासाठी चालविण्याची योजना आहे. या बसेस एसटीच्या स्वत: मालकीच्या असणार असून त्यांना टोमॅटो रेड कलर देण्यात आला आहे. या बसेस 44 आसनी असणार असून 11 उभे प्रवासी अशी त्यांची रचना असणार आहे.

एसटीच्या या नव्या बसेसची उंची 3120 एमएम असणार आहे. म्हणजेच सध्याच्या एमएस माईल्ड स्टील बांधणीच्या ( 3200 एमएम ) उंचीपेक्षा नव्या बसेसची उंची 80 एमएमने कमी करण्यात आली आहे. या बसेसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 13 पॅनिक बटणे देण्यात आली आहेत. तसेच या बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसविण्यात येणार आहे, त्यामुळे बसचे लोकेशन कळण्यास मदत होणार आहे. या बसेसना स्लायडींग आणि फिक्स्ड अशा कोम्बीनेशनच्या असणार आहेत. या बसेसचे फ्लोरींगसाठी 3.15 एमएम अॅल्यूमिनियम चेकर्ड प्लेट वापरण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.