संजय राठोडांनी राजीनामा दिला हे योग्यच; आता या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. (pankaja munde demands fair investigation in Pooja Chavan Suicide Case)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:28 PM, 1 Mar 2021
संजय राठोडांनी राजीनामा दिला हे योग्यच; आता या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी: पंकजा मुंडे
पंकजा मुंडे, भाजप नेत्या

मुंबई: उशिरा का होईना संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ही सकारात्मक बाब आहे. परंतु आता या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. (pankaja munde demands fair investigation in Pooja Chavan Suicide Case)

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. संजय राठोड यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याची एक पायरी ओलांडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असेल तर वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. सध्या राजकीय नेत्यांची अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे एक वेगळी यंत्रणाच अशा प्रकरणाच्या तपासणीसाठी असावी का असंही वाटू लागलं आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटंल आहे.

सरकार टिकविण्याचा आटापिटा नको

सरकार टिकवण्यासाठी किंवा एखादी आघाडी टिकवण्यासाठी काही लोकांना पाठिशी घालणं योग्य नाही. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. कोणत्याही दबावाखाली हा तपास होऊ नये. सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नाही. त्यामुळेच देशालाही आदर्श घालून दिला जाईल असा या प्रकरणाचा तपास करण्यात आला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

कोणते ट्रेंड सेट करत आहोत?

आम्ही मागच्या पिढीचे आदर्श घेऊन घडत गेलो. पण आज वेगळेच ट्रेंड सेट होत आहेत. आमच्या पिढीकडून पुढच्या पिढीने काय घेतलं पाहिजे? आम्ही काय ट्रेंड सेट करत आहोत? या सर्व गोष्टींचा चौफेर विचार करायला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

पूजा प्रकरणाचं राजकारण नको

राठोड यांनी राजीनामा दिला हा मुद्दा नसून निष्पक्षपणे चौकशी होणं हा मुद्दा आहे. त्या क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणं यंत्रणेचं काम आहे. या प्रकरणावरून कोणतंही राजकारण होता कामा नये, असं सांगतानाच राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असं नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. (pankaja munde demands fair investigation in Pooja Chavan Suicide Case)

 

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार

वनमंत्री पदासाठी आता काँग्रेसचं लॉबिंग, मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी!

(pankaja munde demands fair investigation in Pooja Chavan Suicide Case)