AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पाईपलाईन्सवर वास्तव्य करणारे लोक म्हणजे दहशतवादी नव्हेत: मेधा पाटकर

माहुलवासीयांना त्यांच्या हक्काचे घर मालाड पूर्व आप्पा पाडा येथे देण्याचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. | Medha Patkar

मुंबईत पाईपलाईन्सवर वास्तव्य करणारे लोक म्हणजे दहशतवादी नव्हेत: मेधा पाटकर
प्रातिनिधीक छायाचित्र
| Updated on: Jan 28, 2021 | 11:49 PM
Share

मुंबई: मुंबई शहरात पाईपलाईंनीवर वास्तव्य करणारे नागरिक हे काही दहशतवादी नसतात. सरकारने प्रकल्पबाधित लोकांमध्ये त्यांचाही अंतर्भाव केला पाहिजे, असे वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी केले. (Home distrubution to Mahul Project victims in Mumbai)

त्या गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. माहुलवासीयांना त्यांच्या हक्काचे घर मालाड पूर्व आप्पा पाडा येथे देण्याचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. त्यावेळी माहुलवासीयांना त्यांच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाला मेधा पाटकर आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी मेधा पाटकर यांनी पाईपलाईन्सवर राहणाऱ्या लोकांचा प्रकल्पबाधित म्हणून विचार करावा, ही मागणी बोलून दाखविली.

विकास करताना स्थानिकांचा विचार करणार: आदित्य ठाकरे

मुंबईतील प्रकल्पबाधितांनी त्याचा परिसरात घर कसे देता येईल, यादृष्टीने राज्य सरकार विचार करत आहे. आम्ही सध्या 30 हजार घरे बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबईतील माहुल आणि आरे यासारख्या भागांतील स्थानिकांच्या संघर्षामध्ये मी स्वत: सहभागी झालो होतो. आता आमचं सरकार आलं आहे. कित्येक वर्षानंतर राज्याला मुंबईचा मुख्यमंत्री मिळाला. आपण आरेचा बरासचा भाग वाचवला आहे. 10 हजार हेक्टर कांदळवन वाचवणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तसेच विकास हा स्थानिक लोकांसाठी व्हावा. प्रत्येक माणसाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. देश किंवा राज्य असे घडले पाहिजे की जेथे आंदोलनाची गरज भासणार नाही, असेही आदित्य यांनी म्हटले.

माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना 286 कोटींचा दंड

मुंबईतील माहुलमधील प्रदूषण बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना भोवलं आहे. माहुल गावातील प्रदूषणासाठी चार कंपन्यांना 286 कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे. माहुल हे ईशान्य मुंबईतील जुने गाव आहे. या ठिकाणी मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. कंपन्यांमुळे माहुलमध्ये वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे नोंदवण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना 286 कोटींचा दंड

आनंदाची बातमी: मानवरहित मेट्रो ट्रेनचे कोचेस मुंबईत दाखल; फेब्रुवारीत ट्रायल रन

(Home distrubution to Mahul Project victims in Mumbai)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.