फोन टॅपिंग प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसाठी सीबीआयची विशेष कोर्टात धाव

कोर्टाने या प्रकरणात 9 जूनपर्यंत राज्य सरकारला दिलासा दिला आहे, मात्र सीबीआयने आता विशेष कोर्टात धाव घेतली आहे. (Phone Tapping Case CBI )

फोन टॅपिंग प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसाठी सीबीआयची विशेष कोर्टात धाव
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:29 AM

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणातील (Phone Tapping Case) कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळवण्यासाठी सीबीआयने विशेष कोर्टात धाव घेतली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात तयार केलेल्या अहवालाबाबत सीबीआयला राज्य सरकारकडून कागदपत्रे हवी आहेत. या प्रकरणात सीबीआयने रश्मी शुक्ला यांना साक्षीदार केले असून हैदराबादमध्ये या प्रकरणात शुक्ला यांचा जबाब आधीच नोंदवण्यात आला होता. (Phone Tapping Case Rashmi Shukla CBI in Special Court)

कोर्टाने या प्रकरणात 9 जूनपर्यंत राज्य सरकारला दिलासा दिला आहे, मात्र सीबीआयने आता विशेष कोर्टात धाव घेतली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दरमहा 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. ज्यामध्ये अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करत होते, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांकडून जबाब

दुसरीकडे, फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनीही अखेर रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. हैदराबादमधील घरी जाऊन मुंबई पोलिसांच्या पाच अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले.

ऑफिशिअल सेक्रेटस अॅक्ट 1923 अंतर्गत दाखल एफआयआर प्रकरणी मागील आठवड्यात रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद निवासस्थानी जबाब नोंदवला गेला. पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांची टीम तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

मुंबईला येण्यास नकार

राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात गुन्हा दाखल असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, रश्मी शुक्ला यांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत मुंबईत येण्यास नकार दिला होता. इतकीच गरज असेल तर मला प्रश्न पाठवा, मी उत्तर देते, असेही शुक्ला यांनी कळवले होते. मात्र, त्यानंतरही मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते.

रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव

रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात उच्च न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला होता. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (Phone Tapping Case CBI )

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

संबंधित बातम्या :

अनिल देशमुख वसुली आदेश प्रकरण, रश्मी शुक्लांचा जबाब नोंद, सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार

अखेर रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला, मुंबई पोलिसांची टीम हैदराबादेतील निवासस्थानी

(Phone Tapping Case CBI )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.