
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. नवी मुंबई विमानतळाचे काल थाटात उद्धघाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत डेरेदाखल आहेत. तर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. भाजप आणि गौतम अदानी यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दि. बा. पाटील नव्हे तर मोदी विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे विमानतळ जगात नावारूपास येणार आहे. या विमानतळास भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी शिवसेनेने देखील आग्रह केला. कालच त्यांचं नाव या विमानतळाला द्यायला हवं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या विमानतळाचं उद्धघाटन केलं. पण नाव काय त्या विमानतळच? भाजपने दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध केला. गौतम अदानी यांचा देखील या नावाला विरोध केला आहे, असे संजय राऊत म्हणाले. या विमानतळाला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळं असं नाव द्याव अशी भाजपा अंतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झाल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
जगातील मोठं स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होते, त्यांचे नामांतर नरेंद्र मोदी नावाने झालं. काल दि. बा. पाटील यांचं नाव न देता उद्धघाटन झालं कारण भाजपची ही भूमिका आहे. गौतम अदानी यांचा सुद्धा दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध आहे. एकतर अदानी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असावं अथवा नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा राऊतांनी केला.
मोदी विष्णूचे 13 वे अवतार
मी माहिती देतो तेव्हा खरी असते असा दावा करत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी बैठका देखील प्रमुख नेत्यांबरोबर झाल्या आहेत. भाजप निमंत्रण पत्रिका खाजगी आहे. हे स्थानिक भाजपने काढल्या. मी जी चर्चा आहे ते सांगतोय ते नॅशनल लेव्हलला सुरू आहे, असे राऊत म्हणाले. भूमिपुत्र यांचे नेते पाटील यांच्या नावाला मान्यता दिली आहे त्यांच्या नावाने झालं पाहिजे. मोदी अजरामर आहेत. ते विष्णूचे 13 वे अवतार आहेत. त्यांचे नाव या विमानतळाला देण्याची गरज नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
जाहिरातबाजीवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत जागोजागी पोस्टर्स लागले आहेत. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मोदींच्या प्रसिद्धीसाठी भाजपकडे आणि सरकारकडे पैसे प्रचंड आहेत. त्यासाठी वर्ल्ड बँकेतून कर्ज काढतील. पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. मराठवाड्यात मोर्चा आहे तिथे सविस्तर उद्धव ठाकरे बोलतील. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन मोदींनी केले. पण याची सुरूवात आधीच्या सरकारने केली होती. याची फित कापण्याची काम मोदींनी केले, असा टोला त्यांनी लगावला.