दुसऱ्याच्या कागदपत्रावर 24 वर्षे नोकरी केली, 43 लाख पगार घेतला, पण अखेरच्या टप्प्यात ‘कार्यक्रम’ झाला!

दुसऱ्याची कागदपत्रे सादर करून मुंबई महापालिकेत 24 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यास आझाद मैदान पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाकडून आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश मारूती शेलार असं 53 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

दुसऱ्याच्या कागदपत्रावर 24 वर्षे नोकरी केली, 43 लाख पगार घेतला, पण अखेरच्या टप्प्यात 'कार्यक्रम' झाला!
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 11:34 AM

मुंबई : दुसऱ्याची कागदपत्रे सादर करून मुंबई महापालिकेत 24 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यास आझाद मैदान पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाकडून आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश मारूती शेलार असं 53 वर्षीय आरोपीचे नाव असून पालिकेने आतापर्यंत त्याला 43 लाख रुपये वेतन अदा केले आहेत.

दुसऱ्याच्या कागदपत्रावर 24 वर्षे नोकरी केली, 43 लाख पगार घेतला

रमेश मारुती शेलार हा 1989 मध्ये माळी म्हणून पालिकेत नोकरीला लागला होता. तेव्हा त्याने सोपान मारुती साबळे जो सध्या पालिकेच्या एफ दक्षिण विभागात मुकादम पदावर कार्यरत आहे त्या व्यक्तीची कागदपत्रे सोबत जोडली होती आणि सोपान साबळे याच नावाने पालिकेत वावरत होता. दोघांचेही नाव तेच, जन्मदिनांक तेच आणि शाळेचा दाखलाही सारखाच आढळल्याने पालिकेने याप्रकरणी २०१७ मध्ये चौकशी सुरू केली होती.

यावेळी चौकशी अधिका-याने दोघानांही ओरिजिनल कागदपत्रे सादर करण्यास सांगितली गेली. तेव्हा रमेश शेलार हा ओरिजिनिल कागदपत्रे सादर करू शकला नाही आणि त्यानंतर तो कामावर येण्यासही बंद झाला. संपूर्ण चौकशीनंतर पालिका प्रशासनाने त्याच्याविरोधात 15 जुलै 2021 रोजी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून पोलिस कोठडी

अखेर पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतली असता आणि मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी दुसऱ्याच्या कागदपत्रावर मुंबई महापालिकेत 24 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. न्यायालयाकडून आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(Police arrest Mumbai Municipal Corporation employee over false documents)

हे ही वाचा :

चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्येप्रकरणी पिंपरीत तरुणाला बेड्या

गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.