AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | ठाण्यात घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोण-कोण पोहोचलं? अजितदादांनी कशाबद्दल व्यक्त केली खंत?

Loksabha Election 2024 | महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने सूत्र हलतायत. मुंबई, ठाणे, दिल्ली येथे एकाचवेळी घडामोडी घडतायत. महायुतीकडून कोण, कुठल्या मतदारसंघातून लढणार हे आज जाहीर होऊ शकतं. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज शिक्कामोर्तब होऊ शकत. आता प्रतिक्षा फक्त बैठकीतून काय निष्पन्न होतं, त्याकडे लागल आहे.

Eknath Shinde | ठाण्यात घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोण-कोण पोहोचलं? अजितदादांनी कशाबद्दल व्यक्त केली खंत?
mns mahayuti
| Updated on: Mar 19, 2024 | 1:05 PM
Share

मुंबई (गिरीश गायकवाड) | महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज कधीही उर्वरित 28 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार यादी जाहीर होऊ शकते. भाजपाने दुसरी उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली होती. पण महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने अद्यापही जागा जाहीर केलेल्या नाहीत. कारण काही जागांवरुन महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे जागा वाटप रखडल आहे. पण आज जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत आहेत. तिथे त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरु आहे. मनसे सुद्धा महायुतीचा भाग बनू शकते. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार आले आहेत. तिथे भाजपा नेते आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरु आहेत. एकूणच आज प्रचंड राजकीय घडामोडींचा दिवस असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा लढण्यावर ठाम आहे. जागेची अदलाबदल करा दादांचा बैठकीत आग्रह. जागांची अदलाबदल न केल्यास महायुतीच तसच पक्षाचंही नुकसान होईल अशी अजित पवारांनी बैठकीत खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाला कमी जागा मिळतील अशी चर्चा आहे. पण भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील घटक पक्षांना सन्मानजनक जागा देऊ असं सांगितलं आहे. मनसेला युतीमध्ये घेण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुद्धा घडामोडी घडत आहेत. शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहूल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी पोहचलेत. राहुल शेवाळे यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे देखील उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी पुढील 24 तासात जाहीर होणार असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट