AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Special Report VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गो ब्राह्मणप्रतिपालक’ म्हणताच, शरद पवार डोक्याला हात लावून का म्हणाले, “अरे बापरे बापरे”

छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे एका मर्यादित कर्तृ्ताव बंदिस्त करण्यासारखं आहे असं अजित पवार यांनी सांगितले.

TV9 Special Report VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांना 'गो ब्राह्मणप्रतिपालक' म्हणताच, शरद पवार डोक्याला हात लावून का म्हणाले, अरे बापरे बापरे
| Updated on: Jan 04, 2023 | 10:28 PM
Share

मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न म्हणता ते स्वराज्यरक्षक होते या विधानावर ठाम राहिल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपाधीवरून वाद निर्माण करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणायचं की, जाणता राजा म्हणायचे यावरूनही आता राजकारण रंगले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बिरूदावरून वाद चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरून आता वाद उफाळू आला आहे.

शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरून अजित पवार यांना छेडले असते त्यांनी थेट माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा असं आम्ही कधी म्हणालो असा सवाल त्यांनी केला. महापुरुषांना लावण्यात आलेल्या बिरुदावलींवरचं राजकारण आता तापले असल्याचे दिसून येते आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखे आहे असं मत अजित पवार यांनी मांडले.

तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जाणता राजा, छत्रपती, गोब्राह्मणप्रतिपालक असं न म्हणता महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो कुळवाडीभूषण असा उल्लेख शिवाजी महाराज यांचा केला होता तोच योग्य होता असं शरद पवार यांनी मत व्यक्त केले होते.

त्यामुळे जाणता राजा, गोब्राह्मणप्रतिपालक हे बिरूद न वापरताय कुळवाडीभूषण हेच बिरुद योग्य असल्याच मतही व्यक्त करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे एका मर्यादित कर्तृ्ताव बंदिस्त करण्यासारखं आहे असं अजित पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजाना वर्षोनुवर्षे गोब्राह्मणप्रतिपालक म्हटले जाते, मात्र हे असं म्हणणे म्हणजे एका मर्यादित रुपात बंदिस्त करण्यासारखं नाही का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

स्वराज्यसंस्थापक, हिंदवी संस्थापक, शेरशिवराज, गोब्राह्मणप्रतिपालक, जाणता राजा, महात्मा फुले यांनी कुळवाडीभूषण,श्रीमंतयोगी अशी अनेक बिरुंद छत्रपती शिवाजी महाराज यांना लावण्यात आली आहेत. मात्र महात्मा फुले यांनी त्यांना कुळवाडीभूषण असं बिरूद लावून छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वसमावेश करण्याचे काम केले आहे असं मतही व्यक्त करण्यात आले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.