AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Politics Superstition : हा कक्ष नको रे बाबा! मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ चं गुढ काय? का फुटतो मंत्र्यांना घाम

Maharashtra Mantralay Room No 602 : राज्याच्या राजकारणात गुन्हेगारी, खंडणी, खून, हत्या, राजीनामा याची चर्चा सुरू असतानाच राजकीय अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरू आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेली मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काय तिचे गूढ?

Politics Superstition : हा कक्ष नको रे बाबा! मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ चं गुढ काय? का फुटतो मंत्र्यांना घाम
मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२
| Edited By: | Updated on: Dec 26, 2024 | 12:07 PM
Share

राज्याच्या राजकारणात गुन्हेगारी, खंडणी, खून, हत्या, राजीनामा याची चर्चा सुरू असतानाच राजकीय अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरू आहे.राज्य सचिवालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेली ही खोली घ्यायला मंत्री मागेपुढे पाहातात. ही खोली भूतकाळातील काही धारणांमुळे बदनाम झाली असून ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीला राजकीय जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो, असा समज आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेली मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काय तिचे गूढ?

हा कक्ष नको रे बाबा

मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ या खोलीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत, राज्य सचिवालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेली ही खोली घ्यायला मंत्री मागेपुढे पाहातात. ही खोली भूतकाळातील काही धारणांमुळे बदनाम झाली असून ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीला राजकीय जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो आणि पदाचा राजीनामा द्यावा लागतो असा समज झालाय.

असा हा घटनाक्रम

१. मागील अडीच दशकांपासून ज्या-ज्या मंत्र्यांना ही खोली मिळाली, त्या सर्वांना कुठल्या तरी वाईट गोष्टीचा सामना करावा लागला अशी समजूत आहे.

२. १९९९ मध्ये ही खोली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती. पण २००३ मध्ये ते तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले.

३. त्यांच्यानंतर आलेल्या अजित पवार यांना देखील सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला.

४. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचे सरकार आले तेव्हा ही खोली देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना देण्यात आली होती. पुढे खडसे यांना देखील जमीन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला.

५. खडसे यांच्यानंतर ही खोली पांडुरंग फुंडकर या भाजपाच्या दुसर्‍या मंत्र्‍यांना देण्यात आली, ज्यांचा २०१८ अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

६. त्यानंतर ही खोली भाजपा नेते अनिल बोंडे यांना देण्यात आली, जे २०१९ मध्ये निवडणुकीत पराभूत झाले.

७. सध्याच्या सरकारमध्ये ही खोली भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आली आहे.

८. मात्र या ६०२ क्रमांकाच्या खोलीचा मागचा इतिहास पाहाता त्यांच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

९. सध्या ही खोली पीडब्लूडी अधिकार्‍यांकडून वापरली जात आहे. तर शिवेंद्रराजे हे त्याच्या बाजूची खोली वापरत आहेत…

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.