लग्नात वऱ्हाडी मंडळी जास्त, तर नवरदेवावर कारवाई होणार!

आता लग्न समारंभात 100 पेक्षा जास्त लोक असतील तर थेट नवरदेवावर आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कारवाई होणार.

लग्नात वऱ्हाडी मंडळी जास्त, तर नवरदेवावर कारवाई होणार!

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि नियमांमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर मुंबईत लग्न समारंभ, इतर कौटुंबिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात मोठी गर्दी पाहायला मिळत होती. फक्त 100 लोकांना परवानगी असताना लग्न समारंभात मोठ्या संख्येनं लोक उपस्थिती लावत होते. सर्व नियम धाब्यावर बसवून विविध कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असल्यानं कोरोना रुग्णांच्या प्रमाणात आता वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता लग्न समारंभात 100 पेक्षा जास्त लोक असतील तर थेट नवरदेवावर आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय.(possibility of strict restrictions on wedding ceremonies in the background of the corona)

गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता विविध कार्यक्रम, बैठका, सभा आदींवर पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोठ्या कार्यक्रमातून कोरोनाचा जास्त प्रसार

मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर लोकांनी कुटुंबातील अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर अनलॉकिंगला सुरुवात झाली आणि काही अटींसह कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ लागली. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडू लागले आहेत. लग्नासाठी 100 लोकांची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी लोक लग्नाला उपस्थित राहत असल्याचं दिसत आहे. इतकच नाही तर तोंडाला मास्क लावण्याचं प्रमाणही घटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

नवरदेवावरच कारवाई?

लग्न समारंभात घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात आहेत. लोकांच्या उपस्थितीची मर्यादाही ओलांडली जात आहे. आता लग्नसमारंभात 100 पेक्षा जास्त लोक जमा होऊ लागले तर थेट नवरदेवावरच कारवाई होण्याची शक्यता आहे. तसंच कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवरही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोडांच्या भागात परिस्थिती गंभीर; कदाचित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल: अजित पवार

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची भीती, विनामास्क प्रवाशांवर रेल्वेतही कारवाई

possibility of strict restrictions on wedding ceremonies in the background of the corona

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI