AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा जयंत पाटलांना फोन, आणि…, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीच्या बैठकीचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीचे पत्र आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देणारे पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा फोन आला. कॉन्फरन्स कॉलवर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्याशी प्रकाश आंबेडकरांचे बोलणं करून दिलं, अशी माहिती समोर आली आहे.

‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा जयंत पाटलांना फोन, आणि..., पडद्यामागे नेमकं काय घडलं?
| Updated on: Jan 25, 2024 | 7:47 PM
Share

मुंबई | 25 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आज अखेर महाविकास आघाडीकडून तीनही पक्षांच्या सहीचं अधिकृत पत्र पाठवण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज हॉटेल ट्रायडेंट येथे लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. “महाविकास आघाडीच्या बैठकीचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीचे पत्र आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देणारे पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा फोन आला. कॉन्फरन्स कॉलवर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्याशी प्रकाश आंबेडकरांचे बोलणं करून दिलं. त्यावरती बोलताना रमेश चेनिथल्ला यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यासंदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन काँग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले आहेत”, अशी माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

“पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती त्यांनी केली. रमेश चेनीथल्ला यांची ही विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केली आहे, मात्र ती मान्य करतानाच प्रकाश आंबेडकरांनी रमेश चेनीथल्ला यांना महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल अवगत करून दिलं. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा बांधवांचा प्रश्न हा पेटलेला आहे. जरांगेचा आंदोलन असेल किंवा गरीब मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल यासंदर्भात रास्त आणि योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याच आंबेडकरांनी सांगितलं. रमेश चेनीथल्ला यांनी सुद्धा ते मान्य केलं, की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे”, असं सिद्धार्थ मोकेळे यांनी सांगितलं.

“आंबेडकरांनी हेही सांगितलं की ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठ्यांचा आत्ताचा पेटलेला प्रश्न असेल या संदर्भामध्ये काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा तसा थेट संबंध आला नाही. मात्र आम्ही त्या आंदोलनात सुरुवातीपासून आहोत, हा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि या संदर्भातील भूमिका स्पष्ट केल्यावरच आपल्याला पुढे जाता येईल, त्याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण करता येणार नाही. रमेश चेनीथल्ला यांनी हेही मान्य केलं आहे. आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असं आंबेडकरांनी सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना पत्राद्वारे काय म्हटलं याची माहितीसुद्धा समोर आली आहे.

प्रकाश आंबेडकर नाना पटोले यांना पत्राद्वारे काय म्हणाले?

“असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना सुनावलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.