Ram Nath Kovind | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ, थेट राष्ट्रपतीभवनाने मागवली माहिती

राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ पडली आहे. त्यांने मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ हे झाड चांगलेच आवडले आहे. या परिसरातून जात असताना कोविंद (Ramnath Kovind) यांच्या नजरेस हे झाड पडले होते.

Ram Nath Kovind | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ, थेट राष्ट्रपतीभवनाने मागवली माहिती
RAMNATH KOVIND
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:05 AM

मुंबई : राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांनी भूरळ घातली आहे. त्यांनी मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (samudra phal trees) हे झाड चांगलेच आवडले आहे. या परिसरातून जात असताना कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या नजरेस हे झाड पडले होते. त्यानंतर आता थेट राष्ट्रपतीभवनातून या झाडाबद्दलची माहिती विचारण्यात आली आहे. मुंबई कोस्टल रोड (Mumbai Costal Road) परिरस तसेच वरळी सी फेस परिसरात ही झाडे लावण्यात आलेली आहेत. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात आले आहे.

विमानतळावर जाताना राष्ट्रपतींना समुद्रफळाची भुरळ 

मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रामनाथ कोविंद चार दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी रायगडला भेट दिली होती. त्यांची ही भेट चांगलीच चर्चेत आली होती. याच दौऱ्यादरम्यान ते राजभवनातून विमानतळाकडे जात होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या डी आणि जी वॉर्डातून जात असताना त्यांच्या नजरेस समुद्रफळाचे झाड आले. हे हिरवेगार झाड कोविंद यांना त्यावेळी चांगलेच आवडले होते. दरम्यान त्यांनी आता या झाडाची पूर्ण माहिती मुंबई महानगरपालिकेच्या बागकाम करणाऱ्या विभागाला विचारली आहे. विशेष म्हणजे ही माहिती थेट राष्ट्रपतीभवानाकडे विचारण्यात आल्यामुळे पालिकेने ती तत्काळ दिल्लीला पाठवली आहे.

किनाऱ्यालगत समुद्रफळाची एकूण 3632 झाडे लावली

महापलिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पालिका क्षेत्रातील समुद्र किनाऱ्यालगत समुद्रफळाची एकूण 3632 झाडे लावण्यात आली आहेत. हे झाड खाऱ्या पाण्यातही तग धरू शकणारे असून समुद्र किनाऱ्यावर वाढते. आफ्रिकेचा उष्णकटिबंधीय भाग, ऑस्ट्रेलिया तसेच अग्नेय आशिया या भागात ही झाडे आढळतात. या झाडाचे काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. मानवाच्या आतड्यांमधील कृमी नष्ट करण्य़ासाठी या झाडाच्या बियांची मदत होते.

इतर बातम्या :

Mumbai Corona : मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढ, तिसऱ्या लाटेचं संकट? रुग्ण नेमके कुठं वाढले, BMC नं दिली माहिती

Ajit Pawar : मंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार

VIDEO : लांबसडक केस कापायला गेली तरुणी, अन् पार्लरमध्ये केसांनाच लावली आग, पाहा थरारक व्हिडीओ!

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.