AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा धक्का… शिवसेनेची 2018ची घटना अमान्य, राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचं वाचन सुरू

खरी शिवसेना कोणाची यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचन सुरू केलं आहे. नार्वेकर यांनी 2018 ची घटना मान्य नसल्याचं सांगत मोठा धक्का दिला आहे. 1999 ची घटना ग्राह्य धरणार असल्याचं नार्वेकरांनी वाचनात म्हटलं आहे.

सर्वात मोठा धक्का... शिवसेनेची 2018ची घटना अमान्य, राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचं वाचन सुरू
| Updated on: Jan 10, 2024 | 6:09 PM
Share

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या महानिकालाचं वाचन सुरू झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरूवातीला निरिक्षण वाचलीत. निरीक्षणाध्ये नार्वेकर यांनी2018 ची घटना अमान्य असल्याचं म्हटलं आहे. अपात्रतेचा निकाल देताना निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.  2018 ची  घटना अमान्य का याबाबतही नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

दोन्ही गटाने वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही. निवडणूक आयोगाने एक घटना दिली, पण त्यावर तारीख नाही. 2018 ला घटनेत जी दुरुस्त केली ती चूक. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवलेला नाही. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. 2018 सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची?, अधिकृत व्हीप कुणाचा?, बुहमत कुणाचं हे ठरवायचं होतं, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

34 याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. पहिल्या गटातील निरिक्षण मी वाचुन दाखवतो. सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार अध्यक्षांकडून संपूर्ण निकाल पत्र न वाचता निरिक्षण वाचली जात आहेत.

दरम्यान, घटना, पक्षीय रचना आणि विधीमंडळ पक्ष यावर हा निकाल आधारित असेल. 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.