AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात, उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा

सकाळपासून मुंबईतल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गर्मीपासून त्रस्त झालेल्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काही लोकं सकाळी पावसाचा आनंद घेत आहेत.

मुंबईत काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात, उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना  दिलासा
mumbai rain start Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 24, 2023 | 8:50 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतल्या काही ठिकाणी सकाळपासून पावसाला (Mansoon rain update) सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर वातावरणात गारवा असून अनेक ठिकाणी पावसाची (IMD) शक्यता आहे. नवी मुंबईत सुध्दा सकाळी जुईनगर आणि नेरुळ भागात रिमझिम पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरु होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आल्यानंतर मान्सून (Today mumbai pune maharashtra rain update) गायब झाला होता. सध्याचं वातावरण हे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल असून सगळीकडे पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्या भागात पाऊस झाला आहे. तिथल्या नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर पुन्हा खूश असल्याचे पाहायला मिळत आहे.

कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसरसह मुंबई उपनगरात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबईत आतापर्यंत फक्त रिमझिम पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवू लागला आहे. मुंबईत उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

काल नागपूर आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. त्यामुळे तिकडं शेतकरीवर्ग अधिक आनंदात आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. सध्याचं वातावरणं हे महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल असून लवकरचं मान्सून महाराष्ट्रात सगळीकडे दाखल होईल असा हवामान खात्याने अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

उद्यापसून विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून तुरळक पाऊस होईल. त्याचबरोबर पुढच्या 24 तासात पुण्यात होणार आहे.

25 तारखेपासून कोल्हापूर, नाशिक , सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यात सध्या ‘यलो अलर्ट’ असून 27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी केला जाणार आहे.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन